Paithan Farmers Protest | मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफी निर्णयाची पैठणमध्ये प्रतिकात्मक होळी

शेतकरी स्वाभिमानी संघटना, छावा क्रांतिवीर सेना तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आंदोलन
 Chief Minister Loan Waiver Decision
शेतकरी कर्जमाफी निर्णयाच्या निषेधार्थ पैठण बसस्थानक चौकात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने प्रतीकात्मक होळी करण्यात आली.Pudhari
Published on
Updated on

Chief Minister Loan Waiver Decision

पैठण : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी निर्णयाच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. ४) सकाळी पैठण बसस्थानक चौकात शेतकरी स्वाभिमानी संघटना, छावा क्रांतिवीर सेना तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने प्रतीकात्मक होळी करण्यात आली.

राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असून त्यामध्ये किचकट अटी व नियमांचा समावेश करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या योजनेच्या निषेधार्थ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकरी बांधवांनी शासनाविरोधात घोषणाबाजी करत निर्णयाची होळी केली.

 Chief Minister Loan Waiver Decision
Paithan Crime : पैठण पोलिस ठाणे, रुग्णालयात संतप्त नातेवाइकांचा ठिय्या

यावेळी शासनाने सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच या मागणीची दखल न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

आंदोलनात छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल पाटील राऊत यांच्यासह ज्ञानदेव मुळे, ज्ञानेश्वर उगले, साईनाथ कर्डिले, रामेश्वर बावणे, विशाल काळे, किशोर सदावर्ते, पवन सिसोदे, शिवाजी साबळे, सुभाष नवथर, कल्याण पोकळे, अशोक ठोंबरे, एकनाथ मिसाळ, संभाजी डांगे, कैलास मोरे, शिवाजी साटोले, विष्णू बर्डे आणि कृष्णा काळे यांच्यासह अनेक शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news