

Terror of weapons in Khultabad, five arrested
खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा :
शहरात अवैधरीत्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या व ही शस्त्र दाखवत परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या पाच जणांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून एक गावटी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, चार तलवारी व एक कोयता आदी शस्त्र जप्त केली.
मोहमंद अल्तमश मोहमंद फईम (वय २५, रा. बडकेआली मो-हल्ला), मोहमंद मुजाहिद निसार कुरेशी (२४ बडकेआली मो-हल्ला), फलक शहा नासेर शहा (२२, सईदानिमा मोहल्ला), फईजान शहा अब्दुल शहा (२६, बाजारगल्ली (साळीवाडा) व गावठी कट्टा बाळगणारा अजमत खान अजीज खान (२५ रा. गुलाबशहा कॉलनी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी अवैधरित्या घातक शस्त्र बाळगुन दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी पथक तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे मोहिम आखली. गुरुवारी (दि.१०) पथक खुलतावाद शहरात गस्तीवर असताना त्यांना माहिती मिळाली कि, खुलताबाद शहरातील बडकेआली मोहल्ला, सईदानिमा मोहल्ला, गुलाबशहा कॉलनी, साळीवाडा बाजारगल्ली, कुरेशी मो-हल्ला या परिसरातील पाच जणांकडे घातकशस्त्र असुन त्याअ ाधारे ते परिसरात दहशती निर्माण करतात.
या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या भागात सापळा लावुन पाळत ठेवली. आरोपींनी त्यांच्या घर परिसरात लपवून ठेव-लेली धारदार शस्त्र, तलवार, कोयता आद पथकाने जप्त केली.
या सर्व आरोपींविरुध्द खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस करत आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पोलिस उपनिरीक्षक दिपक पारधे, अंमलदार श्रीमंत भालेराव, कासिम पटेल, प्रमोद पाटील, सचिन राठोड, शिवाजी मगर यांनी केली आहे.
ही कारवाई सुरु असताना पथकाला माहिती मिळाली कि, खुलताबाद शहराताली गुलाव शहा कॉलनी, पाण्याचे टाकीजवळ राहणारा अजमत खान अजीज खान हा विनापरवाना बेकायदेशरीपणे गावठी कट्टा बाळगून आहे. यावरुन पथकाने लागलीच त्याचा शोध घेतला असता तो घरी असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवा उडवीचे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. पोलिस खाक्या दाखवल्यावर त्याने मंडप डेकोरेटरच्या सामानामध्ये लपवुन ठेवलेला गावठी कट्टी व दोन जिवंत काडतुस पथकाला काढुन दिले.