Sambhajinagar Accident : भीषण अपघात : ट्रेलर-कार धडकेत महिला ठार, दोन गंभीर

अजिंठा घाटाच्या पायथ्याशी सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला
Sambhajinagar Accident
Sambhajinagar Accident : भीषण अपघात : ट्रेलर-कार धडकेत महिला ठार, दोन गंभीर File Photo
Published on
Updated on

Terrible accident: Woman killed, two seriously injured in trailer-car collision

फर्दापूर, पुढारी वृत्तसेवाः अजिंठा घाटाच्या पायथ्याशी सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले. फर्दापूर-अजिंठा लेणी टी पॉइंटजवळील वळणावर ओव्हरलोड ट्रेलर आणि कार यांच्यात हा भीषण अपघात झाला.

Sambhajinagar Accident
Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचा पुन्हा हाहाकार, संभाजीनगरातील सिल्लोड, सोयगाव तालुक्यातही ढगफुटी

सोमवारी (दि.१५) रात्री ९ वाजेच्या सुमारास (एमएच २१ बीएच ४९१६) ट्रेलर जालना कडून भरधाव वेगाने जळगावच्या दिशेने जात असताना चालकाचा ट्रेलरवरील ताबा सुटला. यामुळे अजिंठा घाटाच्या पायथ्याशी ट्रेलरने समोरून चालणाऱ्या (एमएच ०३ एडब्ल्यू २२६१) कारला जबर धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती की कार जवळपास २० फूट अंतरापर्यंत फरफटत गेली आणि अखेर ट्रेलर थेट कारवरच पलटी झाला. या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला असून, कारमधील तीन व्यक्ती ट्रेलरखाली दबल्या. यामध्ये एका ४० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातात योगेश आस्वाल (३५, रा. सरसोली, जि. जळगाव) आणि सुभाष राजाराम पाटील (६०, रा. जळगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Sambhajinagar Accident
Sambhajinagar Crime : दुचाकी चोरून ऑनलाईन गेममध्ये उधळपट्टी, दोघांना पुंडलिकनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अपघातानंतर स्थानिक नागरिक, आपत्ती व्यवस्थापन पथक व दोन जेसीबी मशीन यांच्या मदतीने सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ट्रेलरखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले असून, मृत महिलेचे शव उत्तरीय तपासणीसाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news