Sambhajinagar Crime : दुचाकी चोरून ऑनलाईन गेममध्ये उधळपट्टी, दोघांना पुंडलिकनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

स्पोर्टसह बाईक, दोन बुलेट जप्त
Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crime : दुचाकी चोरून ऑनलाईन गेममध्ये उधळपट्टी, दोघांना पुंडलिकनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या File Photo
Published on
Updated on

Pundaliknagar police arrest two for stealing two-wheelers and playing online games

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महागड्या दुचाकी चोरी करून १० ते १५ हजार रुपयांना विक्री करून आलेले पैसे ऑनलाईन गेममध्ये उडविणाऱ्या दोन सराईत चोरांना पुंडलिकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून स्पोर्ट बाईक आणि दोन बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत. उमेश सुभाष कळसकर (२४, रा. सुकापुरी, ता. अंबड, ह. मु. मुकुंदवाडी) आणि पुरुषोत्तम बंडू शिंदे (२०, रा. विश्वकर्मा चौक, मुकुंदवाडी, मूळ अंबड) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी सोमवारी (दि. १५) दिली.

Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crime : गुन्हा मागे घे नाही तर तुझी सुपारी देतो; अत्याचार पीडितेला धमकी

अधिक माहितीनुसार, गजानन नगर येथून २३ ऑगस्टच्या रात्री फिर्यादी गणेश शिंदे यांची बुलेट चोरीला गेली होती. पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल होताच विशेष पथकाचे उपनिरीक्षक अर्जुन राऊत यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. एका ठिकाणी आरोपी उमेश दिसून येताच त्याला फोटोवरून निष्पन्न केले. त्यानंतर त्याचा साथीदार गावाकडील मित्र पुरुषोत्तमसोबत मिळून दुचाकी चोरी केल्याची त्यांच्याकडून स्पोर्ट बाईक आणि दोन बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई डीसीपी प्रशांत स्वामी, एसीपी मनीष कल्याणकर, कबुली दिली. अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अर्जुन राऊत, सुनील म्हस्के, शिंदे, संदीप बिडकर, विलास सोळंके, प्रशांत नरोडे, अजय कांबळे यांनी केली.

गणेशोत्सवात पुण्यातून चोरली दुचाकी, पण...

गणेशोत्सवाच्या काळात आरोपी पुण्यात गेले होते. दगडूशेठजवळ गर्दीतून त्यांनी किल्ली असलेली बाईक चोरली. मात्र पोलिसांनी त्यांना शहराकडे येताना रस्त्यात पकडले. कागदपत्रे आणतो, अशी थाप मारून दोघे तेथून पसार झाले होते.

Sambhajinagar Crime
Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचा पुन्हा हाहाकार, संभाजीनगरातील सिल्लोड, सोयगाव तालुक्यातही ढगफुटी

वायर डायरेक्ट करून चोरी

उमेश आणि पुरुषोत्तम हे मूळचे अंबडचे असून मुकुंदवाडी परिसरात वास्तव्यास आहेत. महागड्या दुचाकी वायर डायरेक्ट करून ते चोरी करत. बुलेट चोरली तर नंबर बदलून दुसऱ्या बुलेटचाच नंबर टाकत, जेणेकरून वाहतूक पोलिसांच्या नजरेतून वाचता होईल. दोघेही मोबाईलवर इंस्टाग्राम कॉलिंग वापरायचे. पोलिसांनी उमेशशी संपर्क साधला असता, त्यावेळी कॉलदरम्यान रेल्वेचा आवाज ऐकू आल्याने पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news