

वैजापूर : घरासमोर बांधलेला पाळीव कुत्रा अंगावर भुंकल्यामुळे दोन कुंटुबांतील वाद चांगलाच विकोपाला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी शाब्दिक बाचाबाची होऊन दोन गटात तणाव निर्माण झाला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.
ही घटना मंगळवारी (दि.६) सांयकाळी वैजापूर शहरातील बजरंग चौक येथे घडली. शहरात सध्या तणाव पूर्व शांतता असून पोलिसांनी दोन्ही गटाच्या तक्रारीवरुन वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.