

वैजापूर पुढारी वृत्तसेवा : वैजापूर जिल्हा सत्र न्यायालयातून गंभीर गुन्ह्यातील आरोपीने पलायन केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली. धिरज भरम भोसले (२०) रा.पडेगाव ता कोपरगाव असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार धिरज यांच्यावर आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर गंभीर गुन्ह्यामुळे त्याच्यावर मकोका लावला गेला आहे. त्याची हर्सूल कारागृहात रवानगी आहे. काल दि.(२७) रोजी त्याची येथील न्यायालयात तारीख असल्याने त्याला हजर करण्यात आले होते. तारखेसाठी हजर केल्यानंतर पुन्हा कारागृहात नेण्यासाठी त्याला वाहनात बसवले असता तो पोलीसांच्या हातावर तुरी देऊन तो हाथकडीसह फरार झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
त्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याचा खूप शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.या प्रकरणी सहाय्यक फौजदार जाकेर सिकंदरखॉ पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धिरज भोसले विरूद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.