Vaijapur Crime News : घरासमोर खेळणाऱ्या मुलाचे टेम्‍पोचालकाकडून अपहरण; अवघ्‍या २ तासात पोलिसांनी संशयिताला अशा ठोकल्‍या बेड्या...

नातेवाईकांची हुशारी अन् पोलिसांच्या तात्‍काळ कारवाईने अपहरणकर्त्याचा प्रयत्‍न फसला
Vaijapur Crime News
Vaijapur Crime News : घरासमोर खेळणाऱ्या मुलाचे टेम्‍पोचालकाकडून अपहरण; अवघ्‍या २ तासात पोलिसांनी संशयिताला अशा ठोकल्‍या बेड्या...File Photo
Published on
Updated on

Tempo driver kidnaps child; Police arrest suspect in just 2 hours

वैजापूर : नितीन थोरात

शहरातील लाडगाव रस्त्यावरील घरासमोरून तीन वर्षाच्या मुलाचे आयशर टेम्पोमधून अपहरण केल्याचा प्रकार (शनिवार) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला. परंतु, घरच्या मंडळींनी क्षणाचाही विलंब न लावता याबाबत पोलिसांना व नातेवाईकांना कळवल्याने अपहर्णकरत्याचा प्रयत्न फोल ठरला व पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने हा टेम्पो कोपरगाब तालुक्यातील संवत्सर येथे पकडून अपहरणकर्त्याला ताब्यात घेतले.

Vaijapur Crime News
Drug trafficking : मराठवाड्याच्या मुळावरच अंमली पदार्थांचे सावट; ड्रग्‍स तस्‍करांकडून शाळा, कॉलेजमधील तरूण टार्गेट

बाजीराव भानुदास कांदळकर (४५) असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी आहे. याबाबत अपहरण झालेला कुणाल गणेश फुलारे राहणार लाडगाव रोड वैजापूर याची आई माधुरी फुलारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरुध्द वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी फुलारे या पती, सासू, दीर व आई व मुलासह लाडगाव रोड येथे राहतात व मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा तीन वर्षाचा मुलगा कुणाल हा आजी लताबाई यांच्यासोबत अंगणात होता. लताबाई या काही वेळासाठी घरात आल्या होत्या. मुलासोबत कुणी नसल्याची संधी साधत रस्त्यावरून भुसा घेऊन जाणाऱ्या टेम्पो (क्रमांक एमएच १४ बीजे ४१३२)  चालकाने टेम्पो थांबवून मुलाला जबरदस्तीने टेम्पोत बसवून पलायन केले.

Vaijapur Crime News
china double diplomacy : चीनचा डबल गेम... पहलगाम हल्‍ल्‍याचा पहिला केला निषेध, नंतर पाकिस्‍तानला म्‍हटले 'पोलादी मित्र'

त्यानंतर काही वेळातच लताबाई या घराबाहेर आल्या. त्यावेळी मुलगा अंगणात नसल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यावेळी तेथील लोकांनी मुलाला एकाने गाडीत टाकून नेल्याचे सांगितले. त्यामुळे आई माधुरी व नातेवाईकांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून पोलिसांना हकीकत सांगितली. तसेच संवत्सर येथील नातेवाईकांना कळवले.

Vaijapur Crime News
India Pakistan Conflict : 'भूकेकंगाल' पाकिस्तानचे डोळे उघडणार तर कधी? वाचा 'संभाव्‍य' आर्थिक नुकसानीची आकडेवारी

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत संशयित आरोपी बाजीराव यास संवत्सर येथे जेरबंद करून कुणाल यास सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात दिले. दरम्यान या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news