Tax collection : सातारा-देवळाई, कांचनवाडीत कर आकारणीची मोहीम वेगात

मनपाच्या १३० कर्मचाऱ्यांची पथके कार्यरत : नवीन बांधकामांसह फेरमूल्यांकनालाही वेग
chhatrapati sambhajinagar municipal corporation / छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
Chhatrapati Sambhajinagar Muncipal corporation : मनपा कर्मचाऱ्यांना 3500 रुपये दिवाळी भेटPudhari News Network
Published on
Updated on

Tax collection campaign in full swing in Satara-Devlai, Kanchanwadi

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेने नवीन : मालमत्तांना कर आकारणी आणि जुन्या मालमत्तांचे फेरमूल्यांकन करण्याची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. यात शहरालगतच्या मनपा हद्दीत वाढलेल्या वसाहतींना प्राधान्य दिले जात असून सातारा-देवळाईसह कांचनवाडी-नक्षत्रवाडी परिसरात कर विभागाची विशेष पथके घरोघरी जाऊन पाहणी करत आहेत. या भागातील एकही मालमत्ता कर आकारणी आणि फेरमूल्याकंनातून सुटणार नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी दिली.

chhatrapati sambhajinagar municipal corporation / छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
Chhatrapati Sambhajinagar | प्लास्टिकवर मनपाचा दुहेरी प्रहार

महापालिकेच्या हद्दीत नव्याने विकसित होत असलेल्या वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे उभी राहत आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या बांधकामांची नोंद करून त्यांना कराच्या कक्षेत आणण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी मालमत्ता कर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण १३० जणांची पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

यात प्रत्येक झोन कार्यालयातील नियमित कर वसुली कर्मचाऱ्यांसोबत अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात आले आहे. तसेच नवीन कर आकारणीसाठी मालमत्ताधारकांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर थकबाकीदारांकडूनही कर वसुली मोहीम राबविली जाणार आहे.

chhatrapati sambhajinagar municipal corporation / छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
Sambhajinagar Census : शहरात १ मेपासून सुरू होणार जनगणना

विशेषतः सातारा-देवळाई आणि कांचनवाडी-नक्षत्रवाडी भागात झपाट्याने नागरी वसाहतींचा विस्तार होत असल्याने या परिसरातील नव्या मालमत्तांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासह यापूर्वी कर न लागलेल्या किंवा मूल्यांकन न झालेल्या मालमत्तांचे फेरमूल्यांकन करून नव्याने कर निश्चित केला जाणार आहे.

नव्याने मूल्यांकन करून कर निश्चिती

महापालिकेकडून नव्या व जुन्या मालमत्तांचे फेरमूल्यांकन करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेची झोन-८ आणि झोन-१० मधून सुरुवात करण्यात आली असून सातारा-देवळाई तसेच कांचनवाडी-नक्षत्रवाडी परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके घरोघरी जाऊन पाहणी करत आहेत. यात बांधकामात फेरबदल अथवा वाढ केलेल्या मालमत्तांचे नव्याने मूल्यांकन करून कर निश्चित करण्यात येत आहे, असे मनपा अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news