New Water Supply Scheme : नो नेटवर्कमध्ये आठवडाभरात नळ कनेक्शन

मनपा आयुक्तांचा निर्णय, अर्ध्या इंचीसाठी लागणार ६ हजार रुपये
Water Connection
New Water Supply Scheme : नो नेटवर्कमध्ये आठवडाभरात नळ कनेक्शनPudhari File Photo
Published on
Updated on

Tap connections within a week in 'No Network' areas

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन पाणीपुरवठा योजनेतून येत्या २० जुलैपासून शहरात १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून वाढीव पाण्याची आवक होणार आहे. त्यासोबतच ९ नवे जलकुंभ उपलब्ध होणार आहेत. या जलकुंभाच्या परिसरातील नो नेटवर्क भागात येत्या आठवडाभरात नवे नळ कनेक्शन देण्यास सुरुवात होणार असून, अर्ध्या इंची कनेक्शनसाठी नागरिकांना ६ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

Water Connection
Sambhajinagar Water Supply : नो-नेटवर्क भागातील पाण्याची प्रतीक्षा संपणार

सध्या शहरात केवळ अंतर्गत जलवाहिन्या उपलब्ध असलेल्या भागांनाच नळ कनेक्शन देण्यात येत आहे. परंतु, पुढील आठवड्यापासून शहरातील नो नेटवर्क भागात मोडणाऱ्या वसाहतींनाही नळ कनेक्शन देण्यास सुरुवात केली जाणार आहे. याबाबत माहिती देताना आयुक्त येडगे म्हणाले की, महापालिकेच्या नो नेटवर्क भागातील ९ जलकुंभ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपलब्ध करून देणार आहेत. हे नवे जलकुंभ महापालिकेच्या ताब्यात येणार असल्याने या भागातील ज्या ज्या वसाहतींमध्ये अंतर्गत पाणी वितरणाच्या जलवाहिन्या टाकून झाल्या आहेत.

त्यात्या वसाहतींतील घरांना नळ कनेक्शन देण्यास सुरुवात केली जाणार आहे. पुढील आठवड्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही आयुक्त येडगे म्हणाले. प्लंबरसोबत बैठक घेऊन एक 'स्टँडर्ड एसओपी' तयार केली आहे. त्यानुसार नव्या अर्ध्या इंची कनेक्शनसाठी नागरिकांना ६ हजार रुपये मोजावे लागणार आहे.

Water Connection
Parbhani Municipal Corporation : अनधिकृत बॅनर-होर्डिंग्जवर महापालिकेकडून होणार कारवाई

या वसाहतींचा समावेश

मिसारवाडी, नारेगाव, हरिओमनगर, गरवारे स्टेडियमपासून जवळ असलेल्या वसाहती, आमेरनगर, सुधाकरनगर, शाक्यनगर .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news