

Talathi Pawar murdered while performing his duties
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात कार्यालयात ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संतोष पवार हे कर्तव्य बजावित असताना कार्यालयात घुसून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पवार यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी तलाठी संघटनेने सतत शासनाकडे पाठपुरवा केला. त्यामुळे शासनाकडून ५० लाख रुपयांची मदत मिळाली असून त्यासाठी संघटनेच्या वतीने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले.
तलाठी संतोष पवार यांच्या हत्येच्या र घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली च होती. महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये वसंतापाची लाट पसरली होती. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली न गेली. पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर व कोसळला होता. तलाठी संघटना पवार न कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभी राहिली.
शासनाकडून कुटुंबाला मदत मिळावी, यासाठी संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. त्यासोबतच सूर्यवंशी यांनी पुढाकार घेत राज्यातील सर्व तलाठी सदस्यांकडून पवार कुटुंबाला सुमारे ४५ लाख रुपयांची आर्थिक मदत उभी केली.
पवार कुटुंबाला सावरण्यासाठी शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी आणि अनुकंपा तत्त्वावर वारसाला तत्काळ सेवेत समायोजित करावे, अशी मागणी केली. त्यानंतर विखे पाटील यांनी तत्कालीन हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तत्काळ प्रस्ताव मागवून घेतला. त्यानुसार कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदती मिळाली आहे.
शासनाच्या या निर्णयानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महसूल मंत्री तथा विद्यमान जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश भदाणे, धनंजय साळवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.