Chhatrapati Sambhajinagar News : केमिकल कंपनीतील आगीच्या घटनांवर उपाययोजना करा

एमआयडीसी पोलिसांनी कंपनी मालक, व्यवस्थापनांची घेतली बैठक
Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar News : केमिकल कंपनीतील आगीच्या घटनांवर उपाययोजना कराFile Photo
Published on
Updated on

Take measures against fire incidents in chemical company

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण एमआयडीसी परिसरातील विविध केमिकल कंपन्यात आग लागण्याच्या वाढत्या घटनांवर उपयोजना करून नियंत्रण ठेवण्यासाठी गुरुवारी ( दि.१९) एमआयडीसीतील कंपनी व्यवस्थापनाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

Chhatrapati Sambhajinagar News
Tembhapuri Medium Project : टेंभापुरी मध्यम प्रकल्पात मुरुम माफियांचा धुमाकूळ

पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या सूचनेनुसार झालेल्या बैठकीत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि ईश्वर जगदाळे यांनी एमआयडीसी हद्दीतील गेल्या दोन महिन्यांत काही कंपन्यांत आग लागल्याच्या घटना घडल्याची चिंता व्यक्त केली.

अशा आगीच्या घटना टाळण्यासाठी व त्यावर उपाययोजना व नियंत्रण ठेवण्यासाठी कंपनीचे मालक, एचआर मॅनेजर यांनी आपल्या कंपनीत अपघाताच्या घटना घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. एखादी घटना घडलीच तर सदर ठिकाणी सुरक्षा अनुषंगाने सर्व साहित्य व प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी, सुरक्षारक्षक २४ तास तैनात ठेवून घटनेची खबर तत्काळ पोलिसांना देण्याबाबत सूचना दिल्या.

Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar News : इंग्रजी शाळांचे विद्यार्थी वळले मराठी शाळांकडे

या बैठकीला पैठणी एमआयडीसी परिसरातील विविध केमिकल कंपनी मालक, व्यवस्थापन सुरक्षारक्षक विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news