खरातप्रकरणी आमदारांवरही कारवाई करा; भाकपची निदर्शने

भोंदूबाबा अशोक खरात याला भेटलेल्या सर्वच आमदारांवर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) वतीने सोमवारी (दि.६) क्रांती चौकात निदर्शने केली.
sambhajinagar news
खरातप्रकरणी आमदारांवरही कारवाई करा; भाकपची निदर्शनेfile photo
Published on
Updated on

Take Action Against the MLA as Well in the Kharat Case; CPI Stages Protests

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भोंदूबाबा अशोक खरात याला भेटलेल्या सर्वच आमदारांवर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) वतीने सोमवारी (दि.६) क्रांती चौकात निदर्शने केली.

sambhajinagar news
Bharat Gogawale : खरातचे प्रकरण हाताबाहेर, चौकशीत सर्व निष्पन्न होईल

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या वतीने भोंदू अशोक खरात यांना भेटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात यावी. तसेच राज्यात अंधश्रद्धा पसरवणाऱ्या अशा भोंदू बाबांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी निदर्शकांनी केली. अशा प्रकारच्या घटनांमुळे महाराष्ट्राची देशभरात मोठ्या प्रमाणावर बदनामी होत असूनही सरकार योग्य ती पावले उचलत नसल्याने जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

महाराष्ट्राची ओळख ही पुरोगामी राज्य म्हणून असताना राज्यातील काही आमदार, मंत्री तसेच उपमुख्यमंत्री अशा भोंदू बाबा-बुवांच्या पुढे लोटांगण घालत असल्याची घटना अत्यंत खेदजनक असल्याची टीका यावेळी करण्यात आली.

sambhajinagar news
Solapur News| भोंदूबाबा खरातशी निगडीत लोकप्रतिनिधींचे राजीनामे घ्या

अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पक्षाचे सचिव कॉ. भगवान भोजने, कॉ. प्रकाश पाटील, कॉ. सचिन गंडले, भाऊसाहेब झिरपे, अजय भवलकर, मंगल ठोंबरे, गोरख राठोड, सुनीता लोंढे, विशाल भुमरे, दामोदर मानकापे, सुनील राठोड, मनीषा बल्लाळ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news