Solapur News| भोंदूबाबा खरातशी निगडीत लोकप्रतिनिधींचे राजीनामे घ्या

माजी आ. आडम; माकपकडून खरातच्या प्रतीकात्मक पुतळ्यास फाशी
Solapur News
माकपकडून खरातच्या प्रतीकात्मक पुतळ्यास फाशी
Published on
Updated on

सोलापूर : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच राज्यात वाढत चाललेल्या अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र आणि बुवाबाजीच्या नावाखाली होत असलेल्या शोषणाविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी (दि. 6) जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ खरातच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देऊन दहन केले. खरातशी निगडीत सर्व लोकप्रतिनिधींवर कारवाई करावी, त्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी यावेळी माजी आ. नरसय्या आडममास्तर यांनी केली.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कुख्यात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात महिलांचे व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात शोषण सुरू आहे. खरातच्या प्रकरणात अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी व मंत्री सामील असल्याचे समोर येत असून, ही अत्यंत गंभीर बाब आहे. संविधानाने अपेक्षित केलेला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याऐवजी काही लोकप्रतिनिधी अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.

यावेळी युसुफ शेख, नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी यांची भाषणे झाली. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाच्या यशस्वी करण्यासाठी दत्ता चव्हाण, शेवंता देशमुख, ॲड. अनिल वासम, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी यांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news