Crime News : निलंबित पोलिसाची पुन्हा गुंडगिरी ! भररस्त्यात कुटुंबाला अडवून मारहाण

तरुणाचा आयफोन फोडला; करमाड पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल; एप्रिलमध्येही बिल्डरला लुटल्याप्रकरणी झाली होती अटक
Sambhajinagar Crime News
Crime News : निलंबित पोलिसाची पुन्हा गुंडगिरी ! भररस्त्यात कुटुंबाला अडवून मारहाणFile Photo
Published on
Updated on

Suspended policeman's goondaism again! Family intercepted and assaulted in the middle of the road

छत्रपती संभाजीनगर / करमाड, पुढारी वृत्तसेवा : वाहनाला कट मारल्याचा जाब विचारल्याने एका निलंबित पोलिसाने कुटुंबाला भररस्त्यात अडवून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना करमाड परिसरात घडली. 'मीही पोलिसवाला आहे', अशी धमकी देत त्याने तरुणाचा आयफोन १६ फोडून नुकसान केले. विष्णू सुरेश नानगुडे ऊर्फ विष्णू पाटील (रा. टीव्हीसेंटर) असे या निलंबित पोलिसाचे नाव असून, त्याच्यावर करमाड पोलिस ठाण्यात अदखलपात्र (एनसीआर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच विष्णू पाटीलने एप्रिल महिन्यात एका बिल्डरला अडवून ४० हजार रुपये उकळले होते.

Sambhajinagar Crime News
Bogus Property Registrations : बोगस रजिस्ट्रीचे 'केंद्र' बनले छत्रपती संभाजीनगर

फिर्यादी शाम बाबासाहेब भुतेकर (३३, मूळ रा. पुणे) हे त्यांच्या कुटुंबासह (आई, भाऊ, वहिनी) एका लग्नासाठी जालना येथून छत्रपती संभाजीनगरकडे एर्टिगा कारने (एमएच १४ केक्यू २०६४) येत होते. २४ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास करमाड हद्दीत एका कारने (एमएच २० एचई २०) त्यांच्या गाडीला कट मारला. काही अंतरावर संबंधित वाहन रस्त्यात थांबलेले असल्याने भुतेकर यांनी त्यांना पुढे जाण्यासाठी हॉर्न दिला. यावेळी गाडीतून खाली उतरलेल्या व्यक्तीला भुतेकर यांनी जाब विचारला असता, त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

हा प्रकार पाहून भुतेकर यांनी मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग सुरू केले असता चिडलेल्या आरोपीने त्यांचा आयफोन १६ हिसकावून गाडीवर जोरात आपटला व तोडून टाकला. हे पाहून भुतेकर यांची आई लता या गाडीतून खाली उतरल्या असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करत धक्का दिला व भुतेकर यांची कॉलर पकडून झटापट केली. स्वतः ही व्हिडिओ शूटिंग करत 'तू समोर ये, मीही पोलिसवाला आहे, तुला दाखवतो', अशी धमकी त्याने दिली.

Sambhajinagar Crime News
Crime News : अवैध गॅस रिफिलिंगच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत खंडणी उकळली

इन्स्टाग्रामवरून पटली ओळख

घडलेल्या प्रकारानंतर भुतेकर यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवरील पोस्टवरून या व्यक्तीचे नाव विष्णू सुरेश नानगुडे (रा. टीव्हीसेंटर) असल्याचे ओळखले. याप्रकरणी करमाड पोलिसांत विष्णू नानगुडे व त्याच्या अनोळखी साथीदारावर अदखलपात्र गुन्हा (एनसीआर) दाखल करण्यात आला आहे.

एप्रिलमध्ये बिल्डरला लुटल्याचा प्रताप

आरोपी निलंबित पोलिस विष्णू पाटील याने यापूर्वी १९ एप्रिल रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास सेव्हनहिल रोडवर एका बांधकाम व्यावसायिकाला (बिल्डर) लुटले होते. वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून 'मी पीएसआय विष्णू पाटील आहे', अशी धमकी देत त्याने बिल्डरची सोनसाखळी आणि मोबाईल हिसकावला होता. तसेच गाडीची तोडफोड करून ४० हजार रुपये ऑनलाईन उकळले होते.

या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी विष्णू पाटील आणि त्याच्या चालकाला अटक केली होती. आता पुन्हा याच निलंबित पोलिसाने करमाडमध्ये एका कुटुंबावर दहशत माजवल्याचे समोर आले आहे. तो टीव्हीसेंटर भागात पोलिस भरती अकादमी चालवीत असल्याचेही समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news