Crime News : मेसचे जेवण जास्त घेतले, सिगारेट ओढल्याच्या संशयावरून विद्यार्थ्याला पाईपने बेदम मारहाण

पहाटे २ वाजता टेरेसवर नेऊन अमानुष शिक्षा; पडेगावातील भारत करिअर अकॅडमीतील प्रकार
मेसचे जेवण जास्त घेतले, सिगारेट ओढल्याच्या संशयावरून विद्यार्थ्याला पाईपने बेदम मारहाण
मेसचे जेवण जास्त घेतले, सिगारेट ओढल्याच्या संशयावरून विद्यार्थ्याला पाईपने बेदम मारहाणfile photo
Published on
Updated on

Student brutally beaten with a pipe on suspicion of taking extra food at the mess and smoking cigarettes

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जेवणात जास्तीचे अन्न घेतले आणि तो सिगारेट ओढत असल्याचा संशयावरून पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या १७वर्षीय विद्यार्थ्याला अकॅडमीचा मॅनेजर तथा पीटी मास्तर विवेक ढाकणे याने रबरी पाईप, बेल्ट आणि काठीने अमानुष मारहाण केली. हा संतापजनक प्रकार पड़ेगाव येथील भारत करिअर अकॅडमीमध्ये ७ व ९ जूनदरम्यान घडला. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकॅडमीचा मॅनेजर विवेक ढाकणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेसचे जेवण जास्त घेतले, सिगारेट ओढल्याच्या संशयावरून विद्यार्थ्याला पाईपने बेदम मारहाण
Sambhajinagar News : पप्पांना सांगून तुला मारायला लावतो : 10 वर्षांच्या चिमुकल्याला धमकावले

बुलढाणा येथील ३६ वर्षीय महिलेचा १७ वर्षीय मुलगा (रोहन काल्पनिक नाव) हा गेल्या वर्षीपासून पडेगाव येथील भारत करिअर अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करत आहे. रोहनच्या क्लाससाठी प्रतिवर्ष ३० हजार आणि हॉस्टेल, मेसचे महिन्याला ४ हजार अशी फीस त्याची आई भरते. रविवारी (दि.७) पहाटे २ ते ४ वाजेच्या सुमारास विवेक ढाकणे याने रोहनला अकॅडमीच्या टेरेसवर बोलावले. तू सिगारेट का पितो? अशी विचारणा करत ढाकणेने स्बरी पाईप, बेल्ट आणि काठीने पाठीवर बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे, तर त्याला भिंतीला पाय लावून डोक्यावर उभे राहण्याची अमानुष शिक्षाही दिली. हा सर्व प्रकार अकॅडमीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

जेवण जास्त घेतले म्हणून पुन्हा मारहाण

पहिली घटना ताजी असतानाच, मंगळवारी (दि.२) रात्री ८ वाजेच्या सुमारास मेसमध्ये जेवताना रोहनने जास्तीचे जेवण का घेतले, या कारणावरून विवेक ढाकणे याने त्याला पुन्हा चापटाने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. या सततच्या जाचाला कंटाळून रोहनने आईला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला.

मेसचे जेवण जास्त घेतले, सिगारेट ओढल्याच्या संशयावरून विद्यार्थ्याला पाईपने बेदम मारहाण
Crime News : ऑम्लेट विक्रेत्याला लुटणाऱ्या सराईत मुलाला वाचवण्यासाठी बापाचा पोलिस ठाण्यात राडा

सीसीटीव्ही फुटेजवरून उघडकीस आला प्रकार

मुलाचा फोन आल्यानंतर घाबरलेल्या आईने शहर गाठले आणि अकॅडमीचे संचालक घुगे सर यांची भेट घेतली. सत्यता पडताळण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात विवेक ढाकणे हा रोहनला निर्दयीपणे मारहाण करत असल्याचे आणि अमानुष शिक्षा देत असल्याचे दिसून आले. प्रकरणाचा पुढील तपास हवालदार रवींद्र देशमुख करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news