ST Bus Smart Card : एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप स्मार्ट कार्ड मिळाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
ST bus smart card rule
एसटी सवलतधारकांनो सावधान! आता स्मार्ट कार्डशिवाय प्रवास नाहीpudhari photo
Published on
Updated on

ST's smart card deadline extended till September1

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटी बसमधून प्रवास करताना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप स्मार्ट कार्ड मिळाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

ST bus smart card rule
Sambhajinagar News : सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपकेंना मातोश्रीचे निमंत्रण

राज्य शासनाच्या वतीने अमृत ज्येष्ठांना एसटीमधून मोफत प्रवास, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ५० टक्के सवलत दिली जाते. या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी १ ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. दरम्यान, याला मुदतवाढ दिली असून, आता १ सप्टेंबरपासून हे कार्ड सक्तीचे करण्यात येणार आहे. या मुदतवाढीमुळे एनसीएमसी स्मार्ट कार्ड अद्याप प्राप्त न झालेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ST bus smart card rule
Beef Seized : पानचक्कीजवळ अपघात; डिक्कीत ४०० किलो गोमांस

सवलतींचा लाभ कायमः कार्डसाठी मिळाला अतिरिक्त वेळ

एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्यतेस १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

अमृत ज्येष्ठ नागरिकांचा एसटी प्रवास मोफत

ज्येष्ठ नागरिक, महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत

स्मार्ट कार्ड अद्याप न मिळालेल्या प्रवाशांची गैरसोय टळणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news