

Strong opposition to the expansion of Vande Bharat Express
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्याचा रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. याला छत्रपती संभाजीनगर तसेच जालना येथील प्रवाशांनी कडाडून विरोध केला आहे. हा विरोध पाहता या गाडीचा विस्तार करण्याऐवजी या मार्गावर नवीन रेल्वे सुरू करण्याची विनंती खा. डॉ. भागवत कराड यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.
जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार प्रस्तावित आहे. या विस्तारामुळे छत्रपती संभाजीनगर येथील प्रवाशांवर परिणाम होणार आहे. त्यांना मुंबईत वेळेवर पोहचणे शक्य होणार नाही.
मुंबईसाठी व मुंबई येथून रेल्-वेची वेळ देखील बदलणार आहे. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात याला विरोध होत आहे. नांदेडहून वंदे भारत एक्सप्रेसची मागणी असेल तर या मार्गावर एक नवीन, समर्पित सेवा सुरू करावी, अशी मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.