Chatrapati Sambhajinagar : कुत्र्याचा १० जणांना चावा

गंगापूर शहरात भटक्या कुत्र्याचा उच्छाद; प्रशासनाचे दुर्लक्ष
Dog Attack News
कुत्र्याचा १० जणांना चावाFile Photo
Published on
Updated on

गंगापूर : शहरात भटक्या कुत्र्याने अक्षरशः उच्छाद मांडला असून, शिक्षक पतसंस्थेसमोर दहा ते बारा नागरिकांचा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिक्षक पतसंस्थेसमोरील रस्त्यावर अचानक एका भटक्या कुत्र्याने नागरिकांवर हल्ला चढवला. संध्याकाळच्या सुमारास अनेक नागरिक ये-जा करत असताना कुत्र्याने एकामागोमाग एक अशा पद्धतीने हल्ले केले. या प्रकारात लतीफाबी पठाण, अमृता रोकडे, संभाजी निरपळ, फैसल पठाण, अण्णासाहेब नाथराव पाटील, राजा तिवारी, आवेश शेख, जमीर सफिक शेख, अकबर सय्यद, अल्लाबक्ष बागवान, श्रीराम मुरलीधर साबणे, शहनाब हुसेन पठाण, अहमद बाशवान, महम्मद ज्युरी, अकबर सय्यद जाकीर व अबुजर हसन मणियार यांना कुत्र्याने चावा घेतला.

Dog Attack News
Tirupati Balaji darshan issue : खासदारांच्या दर्शन शिफारस पत्रांना केराची टोपली!

जखमींना तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्वांना आवश्यक उपचार देत अँटी रेबीज लस देण्यास सुरुवात केली आहे. काही जणांच्या पायाला व हाताला गंभीर जखमा झाल्याचे समजते.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पालकांनी आपल्या लहान मुलांना घराबाहेर एकटे न पाठविण्याचे आवाहन केले आहे. नगरपालिकेने तात्काळ भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरात भटक्या कुर्त्यांची वाढती संख्या ही चिंतेची बाब बनली असून, प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Dog Attack News
Police Patil recruitment : पोलिस पाटील भरतीत पारदर्शकतेसाठी पॅनल बदलीचा फंडा

पथकाकडून कुत्र्याचा शोध

शहरात पिसाहलेल्या कुत्र्याने नागरिकाना चावा घेतल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाला कळताच त्यांनी याची दखल घेत तातडीने नगरपालिकेच्या संबंधित विभागाने घटनास्थळी पथक पाठवून त्या कुत्र्याचा शोध सुरू केला. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news