Gas Cylinder News : बंद कंपनीत रिकाम्या गॅस सिलिंडरचा साठा

आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असल्याचे दिसून येत आहे.
Gas Cylinder News
Gas Cylinder News : बंद कंपनीत रिकाम्या गॅस सिलिंडरचा साठाfile photo
Published on
Updated on

Stock of empty gas cylinders in a closed company

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. वालूज महानगरात घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईची शक्यता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी प्रशासनाने तपास मोहीम हाती घेतली.

Gas Cylinder News
LPG Shortage News : घरगुती गॅस मिळेना, ऑनलाईन बुकिंग यंत्रणाही कोलमडली

या दरम्यान मंगळवारी (दि. १७) औद्योगिक क्षेत्रातील एका बंद कंपनीत विविध कंपन्यांचे शेकडो रिकामे गॅस सिलिंडर आढळून आले.

एमआयडीसी क्षेत्रातील बंद कारखाने, मोकळी भूखंडे तसेच ज्या ठिकाणी उद्योग सुरू झालेले नाहीत अशा जागांची तपासणी सुरू आहे. काही ठिकाणी केवळ इमारती उभारून प्रत्यक्ष उद्योग सुरू नसल्याचेही निदर्शनास आले आहे.

Gas Cylinder News
LPG Gas Shortage: व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णपणे बंद झाला का? सरकारने दिले स्पष्टीकरण

याच अनुषंगाने प्रशासनाने सर्वेक्षण मोहीम राबविली आहे. तपासादरम्यान सी-८७/८८ येथील एका बंद कंपनीत भारत गॅस, एचपी गॅस, गो गॅस तसेच इतर कंपन्यांचे घरगुती व व्यावसायिक वापरातील मोठ्या प्रमाणावर रिकामे सिलिंडर साठवलेले आढळले.

हे सिलिंडर अलीम सलीम सय्यद (रा. प्रियदर्शनी कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news