Sambhajinagar News : एकाच हॉटेलात मुक्काम; तरीही दोघांनी भेट टाळली, फडणवीस-शिंदे यांच्यातील नाराजीची चर्चा

प्रचाराच्या लगबगीमुळे भेट झाली नसल्याचे सांगत या दोघांनी नाराजीचा वृत्ताचा इन्कार केला आहे.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : एकाच हॉटेलात मुक्काम; तरीही दोघांनी भेट टाळली, फडणवीस-शिंदे यांच्यातील नाराजीची चर्चाFile Photo
Published on
Updated on

Staying in the same hotel; Still, both avoided meeting, discussion of displeasure between Fadnavis-Shinde

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही रविवारी (दि. ३०) रात्री शहरातील एकाच हॉटेलात मुक्कामी होते. परंतु त्यांनी एकमेकांची भेट टाळली. त्यामुळे दोघांमधील नाराजीच्या चर्चांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. दरम्यान, प्रचाराच्या लगबगीमुळे भेट झाली नसल्याचे सांगत या दोघांनी नाराजीचा वृत्ताचा इन्कार केला आहे.

Sambhajinagar News
E-Samriddhi App : कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्री

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि शिवसेनेकडून परस्परांच्या पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी झाली. या पार्श्वभूमीवर नाराज झालेल्या एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. निर्माण तेव्हापासून फडणवीस आणि शिंदे यांच्यात झाल्याची चर्चा सुरू टाळले होते. दूरावा समारंभात आहे. शिवाय काही एकत्र येऊनही या दोघांनी एकमेकांशी बोलणे त्यात रविवारी रात्री या दोघांनीही पुन्हा एकदा एकाच हॉटेलात मुक्कामी असूनही भेट टाळली.

नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारानिमित्त शिंदे हे रविवारी रात्री हॉटेलात मुक्कामासाठी आले. काही वेळाने फडणवीसही त्याच हॉटेलात आले. मात्र रात्रभर एकाच हॉटेलात थांबूनही या दोघांची भेट झाली नाही. सकाळी फडणवीस हे तेथून प्रच-रारासाठी रवाना झाले. त्यामुळे दोघांमधील नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

Sambhajinagar News
निकाल एकत्रित जाहीर करता येईल का?, खंडपीठाकडून निवडणूक आयोगाला विचारणा

शेड्युल्ड वेगवेगळे असल्याने भेट नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी अगोदर आलो होते. मुख्यमंत्री नंतर आले. परंतु आमची फोनवर चर्चा होत असते. आम्ही दोघेही प्रचाराच्या लगबगीत आहोत.

आमच्यात फोनवर बोलणे सुरू असते...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले, मी इथे रात्री उशिरा आलो आणि त्यांच्यापेक्षा लवकर चाललो, त्यामुळे माझी आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली नाही. उद्या होईल. तसेही फोनवर तर आमचे बोलणे रोजच होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news