

दत्तात्रय काटोले
सोयगाव : सोयगाव शहरासह तालुक्यात अवैध सावकारीने डोके वर काढले आहे. तरुणाईसह शेतकरी व व्यापारीवर्ग या कर्जाच्या जाळ्यात अडकत असल्याच्या तक्रारी आहेत.परवानाधारक सावकारांची संख्या नगण्य असताना, विनापरवाना मव्हाईट कॉलरफ सावकार अव्वाच्यासव्वा व्याजाने कर्ज देऊन आर्थिक शोषण करत आहेत. कर्जाची रक्कम वेळेत न भरल्यास धमकी, मानसिक छळ आदी प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.
शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने तर व्यापारी सामाजिक प्रतिष्ठेच्या भीतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यास धजावत नाहीत. याचाच गैरफायदा घेत अवैध सावकारांनी गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांची मरिकव्हरी एजंटफम्हणून नेमणूक केली आहे. हे एजंट कर्जदारांना धमकावत असून, काही ठिकाणी मारहाणीचेही प्रकार घडत आहेत.
कर्ज वसुलीसाठी पोलिसांच्या हिस्ट्रीशीटवर असणाऱ्या तरुणांचा वापर केल्यामुळे परिसरात गुंडगिरीच्या टोळ्यांचा प्रभाव वाढत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. ही परिस्थिती वेळीच आटोक्यात न आणल्यास भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
नाव न छापण्याच्या अटीवर काही शेतकऱ्यांनी सांगितले की, ङ्गङ्घकर्जाची रक्कम वेळेत देता आली नाही तर हे लोक आमची वाहने, घरातील साहित्य उचलून नेतात. पोलिसांत तक्रार केली तर जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. अवैध व्हाईट कॉलर सावकार कर्ज वसुलीसाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांचा वापर करत आहेत. परिणामी तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण होत असून, शेतकरी व व्यापाऱ्यांचे आर्थिक व मानसिक शोषण वाढले आहे.
अवैध सावकारी विरोधात तक्रार कुठे करावी ?
पोलिस स्टेशन : जवळच्या पोलिस ठाण्यात लेखी तक्रार, जिल्हा निबंधक (सहकार विभाग): सावकारी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अर्जजिल्हाधिकारी कार्यालय विशेष कक्ष किंवा हेल्पलाईनऑनलईन : पोलिस अधीक्षक कार्यालयाचा ई-मेलवर तक्रारी करावी.
कायदा काय म्हणतो?
विनापरवाना सावकारी, धमकावणे, मारहाण किंवा मानसिक छळ हा गुन्हा आहे. अवैध सावकारीसाठी ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास व ५० हजार रुपये दंड, गंभीर छळ केल्यास १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे.
उपनिबंधक कार्यालयाने लक्ष देण्याची गरज
अवैध सावकार व त्यांच्या वसुली एजंट्सचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गुप्तचर यंत्रणा सक्रिय करणे गरजेचे आहे. तसेच तालुका उपनिबंधक कार्यालयाने अवैध सावकारांवर कठोर कारवाई करावी. परवानाधारक सावकारांच्या व्यवहारांवरही कडक नियंत्रण ठेवण्याची मागणी शेतकरी व व्यापारीवर्गातून होत आहे.