Double Sowing Crisis : दुबार मराठवाड्यात पेरणीचे संकट गडद

पावसाने पाठ फिरवली, पिकांनी माना टाकल्या :
Double Sowing Crisis
दुबार मराठवाड्यात पेरणीचे संकट गडदFile Photo
Published on
Updated on

Sowing crisis deepens in Marathwada again

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आधीच विलंबाने आलेल्या आणि त्यानंतर दडी मारलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील बळीराजा हवालदिल झाला. अपुऱ्या पावसामुळे अद्यापही मराठवाड्यात १७ लाख ६५ हजार ७६१ हेक्टर क्षेत्रांवर पेरणीच होऊ शकलेली नाही. जेथे पेरणी झाली ती पिकेही धोक्यात आलेली आहे. मोठा पाऊस झाला नाही तर मराठवाड्यातील बहुतांश भागात दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. पुढील दोन-तीन दिवसांतील पावसावरच खरीप हंगामाचे भवितव्य अवलंबून आहे.

Double Sowing Crisis
Nanded soybean cotton sowing-नांदेड जिल्ह्यात नगदी पिकांवर भर; सोयाबीन, कापसाची पेरणी सुसाट

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांमध्ये यंदा ४९ लाख ७२ हजार ७२८ हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे नियोजन आहे. यंदा जुन मध्ये उशिरा पाऊस सुरू झाला. त्यातही तो मराठवाड्यात अत्यंत तुरळक बरसला. या अपुऱ्या पावसावरच मराठवाड्यातील ४९ लाख हेक्टर पैकी ३२ लाख ६ हजार ९६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून उर्वरित क्षेत्र कोरडेच आहे. जुलैचा महत्त्वाचा कालावधी सुरू असतानाच पावसाने उघडीप दिल्याने उर्वरित पेरणी रखडली आहे.

पेरणी केलेल्या अनेकांनी कर्ज काढून बियाणे, खते आणि मशागतीवर खर्च केला. मात्र, पेरणीनंतर काही दिवसांतच पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, लातूर विभागात १२ लाख ३८ हजार ७५१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. संभाजीनगर विभागात ५९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरण्यात आले आहे.

Double Sowing Crisis
Udgir rainfall update : शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे; खरीप धोक्यात

कपाशीचे क्षेत्र संभाजीनगर विभागात ६ लाख ९ हजार ७९६ हेक्टर, तर लातूर विभागात ३ लाख ४१ हजार ९४० हेक्टर आहे. दोन्ही विभागांत मिळून १ लाख २७ हजार ३७३ हेक्टर क्षेत्रावर मका आणि २ लाख ४३ हजार २३९ हेक्टर क्षेत्रावर तूर पेरण्यात आली आहे. बाजरी, मूग, उडीद, भुईमूग व इतर कडधान्यांचीही मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे.

ऐन पावसाळ्यातही टँकर सुरू

पावसाळा सुरू असूनही धाराशिव वगळता सात जिल्ह्यांतील १८२ गावे आणि ११७ वाड्यांना ३०३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जूनअखेरीस टैंकर सेवा बंद करण्यात आलेल्या संभाजीनगर

पिकांची वाढ खुंटली

पावसाच्या खंडाचा परिणाम आता शेतात दिसू लागला आहे. कपाशी, सोयाबीन आणि मका या पिकांची वाढ मंदावली असून हलक्या जमिनीतील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news