South Central Railway : रेल्वेसह स्थानकांवर कचरा टाकणे महागात पडणार

कचरा टाकताना आढळल्यास एक हजार रुपयांचा दंड; स्वच्छतेच्या उपाययोजना अधिक कडक
sambhajinagar news
रेल्वेसह स्थानकांवर कचरा टाकणे महागात पडणारfile photo
Published on: 
Updated on: 

South Central Railway : Throwing garbage at railway stations will be expensive

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रेल्वेत व रेल्वेस्थानकांवर स्वच्छता राखावी असे रेल्वे विभागांकडून वारंवार अवाहन करण्यात येते. परंतु या आवाहनाला अनेक प्रवासी दाद देत नाहीत. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने आता अशा प्रवाशांविरुद्ध कडक पावले उचली असून रेल्वेसह रेल्वेस्थानकांवर कचरा फेकणे महागात पडणार आहे. अशांना रेल्वेकडून एक हजार रुपये दंड आकारून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने दिली आहे.

sambhajinagar news
Crop Inspection : पीक पाहणी १५ दिवसांत पूर्ण करा; जिल्हाधिकाऱ्यांचे तलाठ्यांना निर्देश

रेल्वे स्थानके, रेल्वेगाड्या आणि इतर रेल्वे परिसरात स्वच्छता राखण्यासाठी रेल्वेने स्वच्छतेसंदर्भातील तरतुदी अधिक बळकट केल्या आहेत. सुधारित नियमांनुसार, स्वच्छतेवर परिणाम करणाऱ्या संबंधित कृतींसाठी १ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. दंडाची रक्कम न भरल्यास, लागू तरतुदींनुसार हे प्रकरण सक्षम न्यायालयासमोर मांडण्यात येणारआहे. न्यायालयांकडून या कृतीसाठी २ हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. अशीही माहिती नांदेड विभागाने दिली आहे.

कचारपेट्या वापरण्याचे आवाहन

रेल्वे स्थानके, प्लॅटफॉर्म, प्रतीक्षालये आणि रेल्वेगाड्या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रशासनांबरोबरच प्रवाशांचीही आहे. यासाठी रेल्वेस्थानकांसह रेल्वेत जागोजागी कचरा पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी उपलब्ध कचरापेट्यांचा वापर करणे अपेक्षित असताना अनेक प्रवासी कचरा इतरत्र फेकत असतात. तसेच रेल्वे परिसरात किंवा रेल्वे रुळांवर कचरा अनेकजण टाकतात. प्रवाशांनी रेल्वे स्वच्छतेसाठी कचरा पेट्यांचा वापर करून प्रशासनला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

sambhajinagar news
Sambhajinagar News : ग्रामीण पोलिसांच्या तपासाने तेलंगणातील कंपनीला लागले टाळे

सामूहिक जबाबदारी

स्वच्छता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी यांच्या एकत्रित प्रयत्नांतून रेल्वे स्थानके व रेल्वेगाड्या अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि आनंददायी बनविता येतील. ही जबाबदारी ओळखून प्रवाशांनी यापुढे कचरा हा कचरा पेटीतच टाकावा अन्यथा त्यांना दंडाच्या रकमेसह इतर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचाही इशारा नांदेड विभागाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news