

Somaiya's complaint, but refusal to give affidavit
सिल्लोड : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जन्म प्रमाणपत्रप्रकरणी पुन्हा एकदा कारवाईची मागणी करत सोमवारी (दि.१) सिल्लोड येथील शहर पोलिस स्टेशन व उपविभागीय अधिकारी कार्यालयात भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तथापि, प्रशासनाच्या गृहचौकशीत एकही विदेशी नागरिक आढळून आलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सोमय्या यांनी सोमवारी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्याशी चर्चा करून संशयास्पद प्रमाणपत्रांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर लतीफ पठाण, तहसीलदार सतीश सोनी मनीषा मेने यांच्या उपस्थितीत महसूल प्रशासनाशीही त्यांनी चर्चा केली. अधिकाऱ्यांनी सोमय्यांना पुन्हा एकदा स्पष्ट केले की, ११०० जन्म प्रमाणपत्रधारकांची चौकशी झाली असून, त्यात कोणताही विदेशी नागरिक सापडलेला नाही.
पत्रकारांना थेट उत्तर देणे टाळले पत्रकारांच्या बहुतेक प्रश्नांना सोमय्या यांनी थेट उत्तर न देता गोलमोल भूमिका घेतली. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जन्म प्रमाणपत्र प्रकरणी केलेल्या आरोपांबाबत शपथपत्र दाखल करण्यास असमर्थता दर्शवली. पत्रकार परिषदेत त्यांनी विदेशी नागरिक असा उल्लेख न करता, बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र मिळवले गेले आहेत असा आरोप कायम ठेवला.