Solar pump wire theft case : सोलर वायर चोरणारी टोळी जेरबंद

एलसीबीची खामकरवाडीमध्ये कारवाई; १७ लाखांच्या मुद्देमाला जप्त
Solar pump wire theft case
खामकरवाडी येथे एलसीबीच्या पथकाने कारवाई करत चार चोरट्यांना ताब्यात घेतले. इन्सेटमध्ये जप्त केलेले मोबाईल, रोख रक्कम.pudhari photo
Published on
Updated on

पैठण : गेल्या काही महिन्यांपासून पाचोडसह सहा जिल्ह्यांत सोलर पंपच्या वायरची चोरी करून धुमाकूळ माजवणाऱ्या महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांमध्ये सोलर ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका अट्टल आणि खतरनाक टोळीचा छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने थरारक पाठलाग करून पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह चार जणांना बेड्या ठोकल्या असून, १७ लाख ८ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

१ मार्च रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास टोळीने पाचोड येथील सब स्टेशनवर धाड टाकली होती. या चोरीत चोरट्यांनी १ लाख १० हजारांची वायर लंपास करून हे चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते. सोलर टेक्निशियन भाऊसाहेब लहू पवार यांच्या तक्रारीवरून पाचोड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता.

Solar pump wire theft case
Chatrapati sambhajinagar : गंगापुरातील ७७ ग्रा.पं.चे कामकाज झाले ठप्प

तपासादरम्यान पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्यासह पोलिसांनी शुक्रवार खामकरवाडी येथे १३ मे रोजी सापळा रचून आरोपी पवन काळेला शिताफीने ताब्यात घेतले. पवन काळेची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याचे जाळे किती विस्तारलेले आहे याचा खुलासा झाला.

त्याच्या माहितीवरून पोलिसांनीसुनील बापू तपकिरे (रा. भोसा साथीदार), तवाब नवाब खान (माल विकत घेणारा दुकानदार), ईश्वर पांडुरंग गवळी (गाडीचा मालक) खालील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून विना क्रमांकाची काळी स्कॉर्पिओ, मोबाईल फोन, चोरीची तांब्याची वायर आणि रोख रक्कम असा एकूण १७ लाख ८ हजार २४० रुपयांचा माल जप्त केला आहे.

सहा जिल्ह्यांत टोळी सक्रिय

अटक करण्यात आलेली टोळी केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच नव्हे, तर जालना, बीड, धाराशिव, अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यांत सक्रिय असल्याचे तपासात उघड झाले आहे. मुख्य आरोपी पवन ऊर्फ छन्नू काळे हा धाराशिव जिल्ह्यातील वाशी व मुरूम पोलिस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यांत फरार होता. तसेच धुळेड्डूसोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी रस्त्यावर टायर फेकून वाहनचालकांना लुटण्याच्या प्रकारातही त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

Solar pump wire theft case
Parbhani gas cylinder raid : परभणीत अवैध घरगुती गॅस वापरावर धडक कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news