Chhatrapati Sambhajinagar News : साप चावलेल्या गरोदर मातेची व्हेंटिलेटरवर प्रसूती

१२ दिवसांच्या उपचारानंतर आईसह बाळ सुखरूप
pregnant woman snake bite case
सर्पदंश झालेल्या गरोदर महिलेची सिझेरियन करत आईसह बाळाचे प्राण वाचवणारे डॉक्टर्स.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : सर्पदंश झालेल्या गरोदर महिलेला गंभीर अवस्थेत येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत व्हेंटिलेटर लावलेल्या अवस्थेतच या महिलेची सिझेरियनने प्रसूती केली. मात्र बाळाची प्रकृती चिंताजनक होती. अखेर १२ दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर आई व बाळाची सुखरूप सुटी करण्यात आली.

नऊ महिन्यांची ही २५ वर्षीय गर्भवती महिला बाळंतपणासाठी माजलगाव येथे माहेरी आली होती. एका रात्री या महिलेच्या उजव्या पायाला साप (घोणस) चावल्याने तिला चक्कर येऊन प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने तिथेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र प्रकृती बिकट झाल्याने व्हेंटिलेटर लावलेल्या अवस्थेतच या महिलेला छत्रपती संभाजीनगरातील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आणले.

pregnant woman snake bite case
Chhatrapati Sambhajinagar road accident : अंधारात वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने कारचा अपघात

गर्भवस्थेमुळे पोटातील बाळावरही संकट निर्माण झाले होते. अशा आव्हानात्मक परिस्थितीत येथील डॉक्टरांनी या महिलेवर तातडीने उपचार सुरू केले. नातेवाइकांच्या संमतीने इर्मजन्सी सिझेरीयन केले, मात्र नवजात शिशू रडला नाही. त्याच्या मेंदूला ऑक्सिजन पोहोचत नसल्याने व्हेंटिलेटर लावावे लागले. सलग १२ दिवस आई व बाळावर उपचार सुरू होते. दोघांची प्रकृती सुधारल्याने ३० जुलै रोजी त्यांना सुटी देण्यात आली.

रुग्णालयातील डॉ. अविनाश कचरे, डॉ. जानकीदेवी बोराडे, डॉ. राहुल गोसावी, डॉ. उमेश गवळी आणि डॉ. निनाद धोकटे यांनी समन्वयाने उपचार केले. त्यांच्या तातडीच्या निर्णयक्षमतेमुळे आणि एकत्रित प्रयत्नामुळे रुग्णाला योग्य उपचार मिळून प्रकृती सुधारली.

तब्बल ४० अॅन्टी स्नेक इंजेक्शन

या महिलेला सर्पदंशानंतर माजलगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेव्हा १० अन्टी स्नेक इंजेक्शन देण्यात आले होते. यानंतर मेडिकव्हर हॉस्पिटलमध्येही २५ अन्टी स्नेक इंजेक्शन असे एकूण ४० इंजेक्शन द्यावे लागले. यासह आवश्यक उपचारही सुरूच होते, अशी माहिती डॉ. अविनाश कचरे यांनी दिली.

pregnant woman snake bite case
Hingoli News : हिंगोलीत उद्धव सेनेला संघटन बांधणीचा विसर !

घाबरू नका, तातडीने रुग्णालयात जा

सुमारे ८० टक्के साप हे बिनविषारी असतात. त्यामुळे साप चावल्यास घाबरून न जाता तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे. हात-पाय घट्ट बांधणे अथवा घरगुती उपाय करू नये. तातडीने योग्य उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते, असे सेंटर हेड डॉ. विशाल कुटे, सेंटर हेड यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news