Sambhajinagar News : गोगलगायींचा कपाशी, मका पिकांवर हल्ला

कृषी विभागाकडून नुकसानीची पाहणी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या : कैलास अकोलकर
Sambhajinagar News
Sambhajinagar News : गोगलगायींचा कपाशी, मका पिकांवर हल्ला File Photo
Published on
Updated on

Snails attack cotton, maize crops

हतनूर, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील हतनूर येथील शिवना नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतात गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढला असून, गोगलगायींनी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कैलास अकोलकर यांनी केली आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : हर्सूल जेलमध्ये पाच कैद्यांचा तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ला

तालुक्यातील हतनूर येथील शिवना नदीच्या परिसरालगत असलेल्या संजय मुचक, राजेंद्र मुचक, मंगेश ढोबळे, प्रभाकर सोनावणे, भिवसन गायकवाड, भगवान शिंदे, दिनकर पवार, राजेंद्र जगताप, साहेबराव कोकाटे, बाळू काकडे, शशिकला घुले, रावसाहेब वेताळ, आदी शेतकऱ्यांच्या शेतात गोगलगाय चा प्रादुर्भाव वाढला असून तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक रामसिंग सिंगल यांनी पाहणी केली. सुरुवातीपासूनचं गोगलगाय ने कवळ्या पिकांवर आक्रमन केल्याने कापूस, मका, मूग, आदी पिके बाद होण्याचे प्रमाण अधिक असून त्यात आता कापूस मकावर सर्वत्र गोगलगायी दिसत असून उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता आहे.

गोगलगायी च्या प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी धस्तवाले असून यावर उपाययोजना करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कैलास अकोलकर यांनी केली. यावेळी सरपंच संतोष पवार, माजी चेअरमन रघुनाथ गायकवाड, माजी पोलीस पाटील प्रकाश पवार, प्रगतशील शेतकरी पांडुरंग शिंदे, विश्वास जाधव, प्रभाकर सोनावणे, साहेबराव कोकाटे, संतोष वाघ, कारभारी माळोदे, कृषी सहाय्यक रामसिंग सिंगल आदी उपास्थितीत होते. दरम्यान गोगलगाय जोमात आ-लेले कपाशी, मका पिकाचे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

Sambhajinagar News
Viral Infection : बालकांना जपा! लहान मुलांमध्ये वाढले व्हायलर इन्फेक्शन
स्नेलकिल एक किलो भिजलेल्या तांदुळात मिश्र करून ठिकठिकाणी टाकावे तसेच ताक अंडी संजीवक म्हणून बरणीमध्ये एक लिटर ताक मध्ये बारा अंडे फोडून मिश्रण करून दररोज हलवून चौथा दिवशी २५० मी ली प्रती पंप वापरून फवारणी करावी.
-रामसिंग सिंगल, कृषी सहाय्यक हतनूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news