ST Bus Smart Card : स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठांच्या खेट्या

एसटी : अंगठ्याचे ठसे उमटेनात; आय स्कॅनर नसल्याने अमृत ज्येष्ठांचे हाल
ST Bus Smart Card
ST Bus Smart Card : स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठांच्या खेट्याfile photo
Published on
Updated on

Smart Cards Now Mandatory for Traveling by ST Bus

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

सवलतधारकांना एसटीतून प्रवास करण्यासाठी आता स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ आणि इतर सवलतधारक या कार्डच्या नोंदणीसाठी धावपळ करत आहेत.

ST Bus Smart Card
स्थायी समिती सभापतीपदी अनिल मकरिये

मात्र, अनेक अमृत ज्येष्ठ नागरिकांच्या हाताचे ठसे वयोमानामुळे उमटत नसल्याने त्यांना आय स्कॅन (डोळे स्कॅन) करणे आवश्यक आहे. परंतु संबंधित एजन्सीकडे आय स्कॅनर उपलब्ध नसल्याने या ज्येष्ठांना उन्हातान्हात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी आधार कार्ड आणि हातांचे ठसे अत्यंत आवश्यक आहेत. त्याशिवाय पुढील प्रक्रिया पूर्ण होत नाही. वाढत्या उन्हात दोन-तीन तास रांगेत उभे राहिल्यानंतरही केवळ तांत्रिक कारणास्तव नाव नोंदणी होत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ST Bus Smart Card
E-Bus : एसटीच्या ताफ्यात आणखी ३५ ई-बस दाखल होणार

२० दिवसांनंतर या...

सिडको एन-४ येथील ८५ वर्षीय अमृत ज्येष्ठ नागरिक धनराज आसाराम पाटणी हे गुरुवारी (दि.१२) सिडको बसस्थानकावर नोंदणीसाठी गेले होते. तब्बल तीन तास रांगेत थांबल्यानंतर त्यांचा नंबर आला, मात्र त्यांच्या अंगठ्याचे ठसे उमटले नाहीत. आय स्कॅनर मशीन उपलब्ध नाही, ती लवकरच येणार असून, त्यासाठी २० दिवसांनंतर या, असे सांगून त्यांना परत पाठवण्यात आले. पाटणी यांच्याप्रमाणेच अनेक ज्येष्ठांना आय स्कॅनर अभावी आल्यापावली परतावे लागत आहे.

अशा प्रकारची एकही तक्रार अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही. तरीही संबंधित एजन्सीकडे आय स्कॅनर उपलब्ध आहे की नाही, याची माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.
नीलिमा इसे, आगार प्रमुख, सिडको बसस्थानक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news