तेरा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर अडीच कोटींचा बोजा

सिल्लोड : वाळूसाठा जप्त प्रकरण, तहसीलदारांची कारवाई
sillod crime news
तेरा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर अडीच कोटींचा बोजाfile photo
Published on
Updated on

Sillod: Sand stock seized; action taken by the Tehsildar

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात विविध ठिकाणी छापा मारून जप्त करण्यात आलेल्या वाळूसाठाप्रकरणी १३ शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर २ कोटी ४९ लाख ९३ हजारांचा बोजा चढवण्यात आला आहे. तहसीलदारांच्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले असून अवैध वाळू वाहतूकप्रकरणी तहसीलदारांनी मंडळ अधिकारी व तीन तलाठ्यांना कारणे दाखवा नोटीसदेखील बजावलेली आहे.

sillod crime news
Sujat Ambedkar : आमची मते गेली कुठे

तालुक्यातील पिंपळगाव पेठ, केहऱ्हाळा, खोडकाईवाडी, धानोरा, उपळी, बोरगाव बाजार, सिसारखेडा आदी ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू होती. तर अनेक ठिकाणी वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा केलेला आहे. रविवारी (दि. १) तहसीलदार संजय देवराये यांनी अचानक गौण खनिज पथकाला घेऊन तालुक्यातील पिंपळगाव पेठ, केहऱ्हाळा, खोडकाईवाडी, बोरगाववाडी शिवारात पाहणी करून जवळपास ७०० पेक्षा अधिक ब्रास वाळूसाठा जप्त केला. तर सोमवारी (दि. २) वाळूसाठा सापडलेल्या शेत मालकांवर दंडात्मक कार्यवाही प्रस्तावित करून सातबाऱ्यावर बोजा चढवण्याचे आदेश संबंधित तलाठ्यांना दिले.

जप्त वाळूसाठा प्रकरणी सलीम पठाण (रा. केन्हाळा) यांच्या गट नं. ४३८ मधील सातबाऱ्यावर १ लाख ३१ हजार, इम्रान शेख युसूफ (रा. केन्हाळा) गट नं. ११५ वर २७ लाख ६३ हजार, ज्ञानेश्वर पांडुरंग दारुंटे (रा. केहऱ्हाळा) गट नं. ५४९ वर १ लाख ९२ हजार ६०० रुपये, संजय पंडित कळम ((रा. केहऱ्हाळा) गट नं. ५५८ वर ७० हजार २०० रुपये, नजीर शेख बुऱ्हाण (रा. बोरगाववाडी) गट नं. ३९० वर १५ लाख ३९ हजार, बाबूराव कोंडिबा दुधे, ईश्वर भिका दुधे, भास्कर प्रभाकर दुधे (रा. खोडकाईवाडी) गट नं. १९० वर २७ लाख ६३ हजार, मोतीराम तेजराव पंडित (रा. खोडकाईवाडी) गट नं. २०८ वर ३ लाख १५ हजार, रेखा फकिरचंद हाडोळे (रा. खोडकाईवाडी) गट नं. २०८ वर १ लाख ६२ हजार, कडूबा त्यैबक हाडोळे (रा. खोडकाईवाडी) गट नं. २०८ वर ४ ६८ हजार, लिंबाजी सांडू दिवटे (रा. पिंपळगाव पेठ, गणेशवाडी) गट. नं. ४५ लाख ९९ हजार, शांताराम पुंजाजी बेलेवार (रापिंपळगाव गणेशवाडी) गट नं. १६९ वर १२ लाख ३३ हजार, साहेबराव गबाजी दिवटे, तालुकराव गवाजी दिवटे (रा. पिंपळगाव पेठ, गणेशवाडी) गट नं. ११३ वर ९१ लाख ८९ हजार, साहेबराव दिवटे (रा. पिंपळगाव पेठ, गणेशवाडी) गट नं. ११४ वर १५ लाख ३९ हजारांचा बोजा चढवण्यात आला आहे.

sillod crime news
क्लीन स्ट्रीट्स ॲप, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशी लिंक करा

तलाठी संघटना आक्रमक

मंडळ अधिकारी, तलाठ्यांना कारणे दाखवा नोटीस बाजावल्याने तलाठी संघटनाही आक्रमक झाली. त्यांनी थेट उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करताना वाळू तस्करांकडून थेट हल्ले केले जातात. असे प्रकार तालुक्यात घडलेले आहे. यासाठी पोलिस बंदोबस्त व अधिकचे मनुष्यबळ गरजेचे आहे. या संदर्भात वरिष्ठांनी ठोस निर्णय घेऊन पथकाला सुरक्षा देणे गरजेचे असल्याचे तलाठी संघटनेने म्हटले आहे. अवैध वाळू वाहतुकीवरून महसूल विभागामधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

मंडळ अधिकारी, तलाठ्यांना नोटीस

दरम्यान अवैध वाळू रोखण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आलेले आहे. कारवाई करण्याच्या सूचना देऊनही पिंपळगाव पेठ, केहऱ्हाळा, खोडकाईवाडी येथून वाळू वाहतूक सुरूच होती. यामुळे तहसीलदारांनी मंडळ अधिकारी काशिनाथ ताठे (सिल्लोड), तलाठी किरण तायडे (सिल्लोड), दीपक बागुल (पिंप्री), मुक्तार शाह (केन्हाळा) यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तर यानंतर तहसीलदारांनी अचानक अॅ क्शन मोडवर येत वाळूसाठे जप्त करीत सातबाऱ्यांवर बोजा चढवण्याचे आदेश काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news