Sillod News : नातवाच्या जीवन संपवल्याच्या धक्क्याने आजीनेही सोडले प्राण

बारावीत कमी मार्क मिळाल्याने एका अठरा वर्षीय विद्यार्थ्याने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
Sillod News
Sillod News : नातवाच्या जीवन संपवल्याच्या धक्क्याने आजीनेही सोडले प्राणfile photo
Published on
Updated on

Sillod News: Grandmother also lost her life due to the shock of her grandson's death

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : बारावीत कमी मार्क मिळाल्याने एका अठरा वर्षीय विद्यार्थ्याने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. नातवाने आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्याने पासष्ट वर्षीय आजीनेही प्राण सोडले. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील दीडगाव येथे रविवारी (दि.५) सकाळी घडली.

Sillod News
Sillod News : तेरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन जीवन संपवले

हर्षल कैलास शेजुळ (१८) असे आत्महत्या केलेल्या नातवाचे नाव आहे. तर पार्वताबाई शंकर शेजुळ (६५) (दोघे रा. दीडगाव) असे निधन झालेल्या आजीचे नाव आहे. हर्षल शेजुळ बारावीला होता. त्याला ५८ टक्के मार्क मिळालेले होते. कमी मार्क मिळाल्याने तो तणावात होता. यातून त्याने शनिवारी (दि.४) रात्री ८ वाजेच्या सुमारास घरातील बाथरूममध्ये गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच शेजारील नागरिकांनी तातडीने सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र येथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. नातवाला रुग्णालयात दाखल केलेले आहे, असे म्हणत घरच्यांनी आजीला मृत्यूची बातमी कळू दिली नाही. मात्र सकाळी नातवाच्या मृत्यूची बातमी कळली.

रविवारी सकाळी नातेवाईक नातवाच्या अंत्यसंस्कारासाठी जमले असता आजीचेही निधन झाल्याचे नातेवाइकांना कळाले व धक्का बसला. या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली असून, पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Sillod News
Kej Crime : केज खूनप्रकरण तापले; अंत्यसंस्कार रोखून कुटुंबीयांचा ठिय्या

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास बीट जमादार राजेंद्र काकडे करीत आहेत.

एकाच वेळी अंत्यसंस्कार

दरम्यान, मृत नातूसह आजीवर सकाळी ११ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर नातवाच्या अंत्यसंस्काराला आलेल्या नातेवाइकांवार एकाच वेळी आजी, नातवावर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली. अंत्यसंस्कारावेळी नातेवाइकांनी हंबरडा फोडला व उपस्थितांनीही अश्रृंना वाट मोकळी करून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news