Sillod News : तेरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन जीवन संपवले

सारोळा येथील घटना, चोवीस तासांनंतर अंत्यसंस्कार
Sillod News
Sillod News : तेरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन जीवन संपवलेfile photo
Published on
Updated on

A 13-year-old girl ended her life by hanging herself

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरात ही घटना तालुक्यातील सारोळा येथे शनिवारी (दि. ६) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून अजिंठा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Sillod News
Crime News : तू आता मर... म्हणत दुसऱ्या बायकोने नवऱ्याला गॅलरीतून खाली फेकले

भारती राजू मुरकुटे (१३, रा. केदारखेडा, ता. भोकरदन, ह. मु. सार-ोळा, ता. सिल्लोड) असे मृत मुलीचे नाव असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. मयत मुलीचे आई - वडील घराबाहेर गेलेले होते.

या दरम्यान घरात कुणी नसताना मृत मुलीने घरातील लोखंडी अँगलला फेट्याचे साह्याने गळफास घेतला. सदर बाब लक्षात येताच आई- वडिलांनी आरडाओरडा केली. शेजारील नागरिकांनी धाव घेत सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

Sillod News
Nanded Murder | हिमायतनगर - बोरगडी तांडा येथे पत्निचा गळा चिरुन खून : पतीनेही घेतला गळफास

दरम्यान मृत मुलीच्या आईचे हे दुसरे लग्न आहे. केदारखेडा (ता. भोकरदन) येथे पहिले लग्न झालेले होते. मृत मुलीची आई गर्भवती असताना पतीने आत्महत्या केली. यानंतर तिच्या आईन हे दुसरे लग्न केले. पहिल्या पतीची मृत मुलगी व दुसऱ्या पतीचे दोन मुले असा हा परिवार सारोळा येथे राहत असताना या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली,

अंत्यसंस्कारसाठी नातेवाईकात वाद :

दरम्यान मृत मुलीवर केदारखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात यावे, असा आग्रह एका गटातील नातेवाईकांनी धरला. तर दुसऱ्या गटातील नातेवाईक सारोळा येथे अंत्यसंस्कार केले जाईल, यावर ठाम होते. यामुळे काही वेळ अंत्यसंस्कारावरुन दोन्ही गटातील नातेवाईकांमध्ये वाद निर्माण झाला होता. अखेर यावर तोडगा काढत चोवीस तासानंतर रविवारी दुपारी चारच्या सुमारास सारोळा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news