Chhatrapati Sambhajinagar crime : घातक रसायनाप्रकरणी पुन्हा दोन जण पोलिसांच्या ताब्यात

सिल्लोड : ग्रामीण पोलिसांची कारवाई, वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त
Chhatrapati Sambhajinagar crime
सिल्लोड : पोलिसांनी पकडलेला घातक रसायनाची वाहतूक करणारा ट्रकpudhari photo
Published on
Updated on

सिल्लोड : घातक रसायन प्रकरणी सोमवारी (दि.२०) दुपारी ग्रामीण पोलिसांनी पुन्हा दोन ट्रक जप्त करत दोघांना ताब्यात घेतले आहे. तर यातील आरोपींची संख्या वाढून ७ झाली आहे. यापूर्वी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतलेले असून, त्यांची रवानगी हर्मूल कारागृहात करण्यात आलेली आहे.

ट्रक चालक शेख सरताज अली शेख हसन अली (४८, रा. मुसापेठ, सनाथनगर), मोहम्मद जाफर मोहम्मद हाफिज (४०, रा. मुसापेठ, महेबुबनगर, तेलंगणा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर यापूर्वी सुदाम बाबूलाल ताटू (रा. उपळी), शेख तौफिक शेख लाल, समीर खाँ शाकेर खाँ पठाण, सय्यद वसीम सय्यद बशीर, शेख अलीम शेख यासीन सर्व रा. सिल्लोड) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी हसूल कारागृहात करण्यात आलेली आहे.

Chhatrapati Sambhajinagar crime
Sambhajinagar cyber crime : सायबर भामट्यांना स्वतःचे बँक खाते देणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचे करियर उद्ध्वस्त

घातक रसायन ज्या ट्रकमधून आणून टाकले तो ट्रक (टीएस-१२, यूसी २८०५) शिऊरकडून (वैजापूर) सिल्लोडमार्गे जळगावकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, बीट जमादार राजू काकडे, हेडकॉन्स्टेबल भिक्कन सतुके, ज्ञानदेव ढाकणे यांनी भराडी येथे सापळा लावला व वरील ट्रक येताच पकडून जप्त केला. तर यादरम्यान पुन्हा एक ट्रक ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून शिऊर (वैजापूर) पोलिसांनी पकडून जप्त केल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.

दरम्यान घातक रसायनाप्रकरणी (ता. जामनेर), फर्दापूर (ता. सोयगाव), सिल्लोड ग्रामीण व सिल्लोड शहर पोलिस ठाणे असे चार गुन्हे दाखलआहे. तर ग्रामीण ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षण रवींद्र ठाकरे यांनी तपास करीत या प्रकरणाचा पर्दाफाश करीत ७ जणांना ताब्यात घेत दोन ट्रक जप्त केले.

चार दिवसांची पोलिस कोठडी

ताब्यात घेतलेल्या आरोपींना (ट्रक चालक) मंगळवारी (दि.२१) सिल्लोड न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणात अजून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून, ग्रामीण पोलिस या प्रकरणाचा बारकाईने तपास करीत आहेत. घातक रसायनाप्रकरणी गुन्हा दाखल होण्याआधीच ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू करीत काही आरोपींची नावे निष्पन्नही केली होती.

Chhatrapati Sambhajinagar crime
Sant Namdev history : हा नाम्‍याची खीर चाखतो....विठोबाने बाल नामदेवांनी आणलेली खीर खाल्‍ल्‍यामुळे तयार झालेला अभंग

परराज्यात कनेक्शन ?

हे घातक रसायन अंकलेश्वर (गुजरात), हैदराबाद येथील कंपन्यांमधून स्थानिकांच्या मदतीने वाहनातून आणून टाकल्याची माहिती समोर येत होती. तर ग्रामीण पोलिसांनी तेलंगणा येथील दोन ट्रक जप्त करीत दोघांना ताब्यात घेतल्याने घातक रसायनचे कनेक्शन परराज्यात असण्याच्या माहितीला आता बळ मिळाले आहे. असे असले तरी ग्रामीण पोलिस आरोपींकडून माहिती काढत घटनेचा तपास पुढे नेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news