Sambhajinagar cyber crime : सायबर भामट्यांना स्वतःचे बँक खाते देणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचे करियर उद्ध्वस्त

मध्यप्रदेशातील बालकाच्या अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्यात महिनाभरापासून खातोय तुरुंगाची हवा
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

प्रमोद अडसुळे

छत्रपती संभाजीनगर: तीन हजार रुपये कमिशन मिळवण्याच्या आमिषाला बळी पडून सायबर गुन्हेगारांना स्वतःचे बँक खाते (म्युल अकाउंट) वापरण्यास देणे एका १९ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला चांगलेच महागात पडले आहे. महिनाभरापूर्वी मध्य प्रदेशातील एका ६ वर्षीय चिमुकल्याच्या अपहरण, खंडणी आणि संशयास्पद मृत्यू प्रकरणात अडकल्याने संपूर्ण करिअर उद्ध्वस्त झाले आहे. पार्थ लंगोटे (रा. पैठण) असे या विद्यार्थ्यांचे नाव असून, तो शहरात राहून एआय विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता.

शिक्षण घेत असतानाच पार्थची जालन्यातील एका भामट्याशी ओळख झाली. आम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो. टॅक्स वाचवण्यासाठी आम्हाला इतर बँक खात्यांची गरज आहे. तुझ्या नावाचे बँक खाते आणि सिमकार्ड आम्हाला दे, त्या बदल्यात तुला दररोज तीन हजार रुपये कमिशन देऊ, असे आमिष या भामट्याने दाखवले. दररोज बसल्याबसल्या पैसे मिळतील या लालसेपोटी पार्थने आपले एसबीआय बँकेचे खाते आणि स्वतःच्या नावाचे सिमकार्ड त्या सायबर गुन्हेगाराच्या स्वाधीन केले.

Crime News
Sambhajinagar land registry scam : बोगस रजिस्ट्री प्रकरण : पाचवी पास हबीबला दाखवायचे कोट्यवधींच्या जमिनीचा मालक

पार्थने खाते दिल्यानंतर इकडे मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यातील करंजिया येथून १७ जून रोजी ६ वर्षांचा इ‌म्रान वडिलांच्या गाडीच्या मागे जाताना अचानक बेपत्ता झाला. त्यांनी शोध पत्रिका व्हायरल करून मुलाची माहिती देण्याचे आवाहन केले. याच संधीचा सायबर भामट्यांनी गैरफायदा घेतला. मुलाच्या वडिलांना (इफ्तिखार खान) फोन करून खंडणी मागितली. मुलाचा जीव वाचवण्यासाठी घाबरलेल्या वडिलांनी तब्बल ६६ हजार रुपये भामट्यांनी दिलेल्या क्यूआर कोडवर पाठवले. मात्र, ही रक्कम थेट पार्थ लंगोटे याच्या बँक खात्यात जमा झाली.

आपल्या खात्यात आलेले पैसे हे एका निष्पाप मुलाच्या खंडणीचे आहेत, याची या विद्यार्थ्याला कल्पनाही नव्हती. थेट गुन्ह्याशी त्याचा संबंध नसला तरी, तांत्रिक पुराव्यांत तो अडकला आणि गंभीर गुन्ह्यात आरोपी झाला. त्याच्या माहितीवरून जालन्यातील मुख्य सूत्रधारालाही पाठलाग करून जेरबंद केले. मात्र, या दोघांचा वापर करणारा नाशिकचा तिसरा आरोपी आणि त्यापुढचा मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाट आहे.

Crime News
Pune Neuroharmony Conference: पुण्यात ‘न्यूरोहार्मनी २.०’ राष्ट्रीय परिषद; मेंदू आरोग्य आणि न्यूरो पुनर्वसनावर देशभरातील तज्ज्ञांची चर्चा

'मनी ट्रेल'वरून गुंतला

खंडणीची रक्कम देऊनही २२ जूनला सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्या चिमुकल्याचा मृतदेह जंगलात संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर मध्य प्रदेश पोलिसांनी खंडणीच्या पैशांचे 'मनी ट्रेल' तपासले असता ते बँक खाते संभाजीनगरमधील पार्थचे असल्याचे उघड झाले. मध्य प्रदेश पोलिसांच्या माहितीवरून पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक अभिजित चिखलीकर आणि अंमलदार दादासाहेब झारगड यांच्या पथकाने महिनाभरापूर्वी तातडीने पार्थला बेड्या ठोकल्या.

काही दिवसांपूर्वीच म्यूल खात्यासंबंधी आम्ही ९ गुन्हे दाखल केले आहेत. अशा प्रकरणात बँक खात्याचा मूळ मालक थेट मुख्य गुन्ह्यात 'सहआरोपी' बनतो. परिणामी करिअर उध्वस्त होते. क्षुल्लक पैशांच्या मोहापायी आपले बँक खाते, आधार कार्ड किंवा सिमकार्ड कोणत्याही अनोळखी व्यक्तीला वापरण्यास देऊ नये.

प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news