Shrikant Shinde : विजयाचा स्ट्राईक रेट आणखी वाढविण्यासाठी आत्मपरीक्षण

खासदार श्रीकांत शिंदे : राज्यभर आढावा बैठकांचे नियोजन
Shrikant Shinde MP
Shrikant Shinde MPPudhari
Published on
Updated on

Shrikant Shinde: Self-introspection to further boost the victory strike rate

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात २०२२ पासून सातत्याने निवडणुका सुरू होत्या. आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचा विजयाचा स्टाईक रेट जास्तच राहिला आहे. मात्र हा टक्का आणखी वाढविण्यासाठी आत्मपरीक्षण आवश्यक आहे. त्यादृष्टीने नवीन संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, आता राज्यभर आढावा बैठका घेण्यात येणार आहेत, अशी माहिती शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी (दि.१२) पत्रकार परिषदेत दिली.

Shrikant Shinde MP
शिवसेनेच्या बैठकीत तक्रारींचा पाढा

शहरातील बीड बायपासवरील सूर्या लॉन्स येथे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीपूर्वी शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री गुलाबराव पाटील, आ. अब्दुल सत्तार, प्रदीप जैस्वाल, विलास भुमरे, संजना जाधव, गुलाबराव पाटील, उपमहापौर राजेंद्र जंजाळ आदी उपस्थित होते.

श्रीकांत शिंदे म्हणाले, मागे झालेल्या लोकसभा, विधानसभा, नगरपरिषद, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत शिवसेनेने कमी जागा लढवल्या असल्या तरी विजयाचा स्ट्राइक रेट मात्र आमचाच जास्त होता. आता आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा विजयाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न असणार आहेत. अंतर्गत मतभेद बाजूला सारून पक्षाच्या संघटनात्मक बळकटीवर भर दिला जाणार आहे. सध्या राज्यात मतदारयाद्यांच्या मॅपिंगचा कार्यक्रम सुरू आहे. यात मतदारांची नावे गहाळ होता कामा नयेत, याची दक्षता घेतली जाणार आहे. त्यादृष्टीने पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जात आहेत.

Shrikant Shinde MP
Mahayuti alliance conflict Parbhani : राज्यात सत्तेत तर जिल्ह्यात एकमेकांच्या विरोधात

महिला आरक्षणावर शिवसेना भाजपसोबत

१६ एप्रिलला संसदेत निवडणुकीत ५० टक्के महिला आरक्षणाचे बिल मंजुरीसाठी आणले जाणार आहे. याविषयी खा. शिंदे म्हणाले, महिला आरक्षणाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. आतापर्यंत काँग्रेसला हे बिल आणता आले नाही. मात्र भाजपच्या एनडीए सरकारने हे बिल आणले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news