

Shri Sant Eknath Maharaj Paduka Snan Ceremony
चंद्रकांत अंबिलवादे
पैठण : होळे (ता. पंढरपूर) येथील शेवटचा मुक्काम पूर्ण करून शेकडो वारकरी भाविक भक्ताच्या उपस्थितीत ङ्गभानुदास एकनाथच्या जयघोषात होळे येथील भीमा नदीच्या तीरावर श्रीसंत एकनाथ महाराज यांच्या पवित्र पादुका स्नान सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला.
मात्र, स्थानिक प्रशासनाच्या वेळ काढून धोरणामुळे स्नान घाटावर संबंधित होळे ग्रामपंचायत विभागाने अस्वच्छ परिसरात थातूरमातूर पद्धतीने दगड धोंडे टाकून स्नान घाट व्यवस्था करण्यात आल्याने वारकऱ्यांनी नारजी व्यक्त केली.
पंढरपूर येथील आषाढी वारी सोहळ्यासाठी मानाचे स्थान असलेल्या श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळा १७ गावांच्या पंचक्रोशीत मुक्काम करून शेवटचा मुक्काम असलेल्या होळे (ता. पंढरपूर जिल्हा सोलापूर) येथील भीमा नदीच्या तीरावर नाथांच्या पवित्र पादुकाला शेकडो वारकरी ह.भ.प गंगाराम महाराज राऊत, भानुदास महाराज, बबन महाराज बोरकर, ऋषिकेश नवले महाराज, लोखंडे महाराज, तळपे महाराज, भवर महाराज, प्रसाद सेवनकर देवा, केदारनाथ शास्त्री महाराज, यांच्यासह भाविक भक्तांच्या उपस्थितीत भानुदास एकनाथ यांच्या जयघोषात पवित्र भीमा स्नान घालण्यात आले. यावेळी भाविकांनी पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. भीमा नदीवर स्नान सोहळा संपन्न झाला.
रविवारी दि.६ रोजी सकाळी पंढरपूर येथील नाथ महाराज मंदिरातून आषाढी एकादशी निमित्त नाथांच्या पादुकाचे हजारो वारकऱ्यांसोबत पंढरीनगरीला नगरप्रदक्षिणा करणार