

Shortage of leafy vegetables due to damage during the monsoon
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पावसाळ्यात नुकसानीमुळे पालेभाज्यांची टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे शनिवारी (दि.१२) वांगे, गवार, शेवगा यासारख्या भाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. दरवाढीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला बसत असून, किलोच्या ऐवजी आता पावकिलो खरेदी करावी लागत आहे.
शहरातील बाजारात वांगे ९० रुपये, गवार १०० रुपये, शेवगा १०० रुपये किलो या दराने विकले जात आहेत. भेंडी, तुरई, चवळी, गाजर, शिमला मिरची यांचे दरही काही प्रमाणात वाढले आहेत. याउलट लिंबू, पत्ता कोबी आणि अद्रक, मेथीचे यांचे दर काहीसे कमी असल्याचे दिसून आले. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून भाज्यांचे दर सातत्याने वाढत आहेत. विशेषतः पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने दर नियंत्रणात येत नाहीत. त्यामुळे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे.
मेथी, पालक, शेपू, करडी, चुका, आंबट चुका आणि कोथिंबीर यांसारख्या काही भाज्यांचे दर मात्र १० ते १५ रुपयांच्या आसपास स्थिर आहेत. यामुळे तरी थोडा दिलासा मिळतो आहे.
वांगे : ९०, गवार : १००, शेवगा ११०, भेंडी : ६०, हिरवी मिरची : ६०, गाजर ४०, पत्ता कोबी : ४०, अद्रक : ४० ते ५०, टोमॅटो ३०, बटाटा : ३०, कांदा : २० ते २५