

Shocking revelations from Valmik Karad's close associate
पाटोदा, पुढारी वृत्तसेवा : संतोष देशमुख खून प्रकरणाची माहिती वाल्मीक कराडने आपल्याला ते प्रकरण समोर येण्याआधीच दिली होती. तसेच महादेव मुंडे खुन प्रकरणाचा मास्टरमांईडही वाल्मीकच होता, इतकेच नव्हे तर वाल्मीक हा धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांचाही काटा काढणार होता, असे खळबळजनक दावे, वाल्मीक कराड याचे नजीकचे सहकारी वाळा बांगर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत केले. तसेच एका दलित कुटुंबालादेखील धमकी देतानाची क्लिप बाळा बांगर यांनी समोर आणली असून यामध्ये वाल्मीक कराड आता सगळ्यांनाच मध्ये घेतो... तू कोण रे कुत्रा ? अशा शब्दात धमकी देत असल्याचे दिसून येते.
बाळा बांगर यांनी पाटोदा येथे बुधवारी पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. बांगर यांनी सांगितले की, एका व्यक्तीने कामासाठी वाल्मीक कराडला लाखो रुपये दिले होते. मात्र वाल्मीक कराडने त्याचे कामही केले नाही आणि पैसेही परत देत नव्हता. त्यामुळे पैसे देणारा तरुणाने वारंवार फोन केले. याचाच वाल्मीक कराडला राग आला आणि त्याने थेट त्या तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केली. याचीच एक धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदेतून समोर आणली. हा धक्कादायक प्रकार आहे. या संदर्भात मी बीड जिल्हा पोलिस अधीक्षक यांना भेटून ही कॉल रेकॉर्डिंग देणार असल्याचे बाळा बांगर यांनी सांगितले आहे.
एवढेच नाही तर माझ्यासह माझ्या कुटुंबाला फार त्रास दिला. माझ्या आईला बीड पोलिसांनी पहाटे अटक केली. रुग्णालयात असताना तिला अंबाजोगाईला रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू केली होती. अतिशय कठीण प्रसंगातून माझ्यासह अनेक कुटुंब गेले आहेत. हळूहळू मी त्याच्या संदर्भातचे खुलासे करणार असल्याचेदेखील बाळा बांगर यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडे यांचे स्वीय सहायक प्रशांत जोशी यांचादेखील काटा काढायचा असल्याचे वाल्मीक कराड याने मला सांगितल्याचे बाळा बांगर यांनी सांगितले. बाळा बांगर : देशमुखांच्या खुनाची मला आधिच दिली कल्पना; महादेव मुंडेंच्या खुनाचा वाल्मीकच मास्टरमाईंड.
बांगर यांनी सांगितले की, मी दिल्लीत असताना मला त्या ठिकाणी ९ डिसेंबर २०२४ ला काही व्यक्ती भेटले. त्यांनी मला फोन लावून दिला. त्यावर वाल्मीक कराड बोलत होता. त्यावेळेस त्याने 'काय नेते, काय युवराज, तुमचाच एक मित्र सरपंच परिषद खल्लास...' असे म्हणाला. वाल्मीक कराड याला साडेपाच वाजताच सरपंच देशमुख यांची हत्या झाली? हे कसे काय माहिती होते? असा प्रश्न देखील बाळा बांगर यांनी म्हटले आहे. तसेच महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातद-`खील वाल्मीक कराडचाच हात असल्याचा आरोप बाळा बांगर यांनी केला आहे.