Niket Dalal death: घर जळालं, झोपण्यासाठी हॉटेलमध्ये गेले; दुसऱ्या मजल्यावरून पडून देशातील पहिल्या दिव्यांग आयर्नमॅनचा मृत्यू

निकेत हे माजी उपमहापौर लता दलाल यांचे चिरंजीव
Ironman Niket Dalal death
निकेत दलालpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जागतिक स्तरावर नावलौकिकप्राप्त, आयर्नमॅनचा किताब जिंकणार्‍या दिव्यांग खेळाडूचा हॉटेलमध्ये दुसर्‍या मजल्यावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.1) सकाळी साडेआठच्या सुमारास समर्थनगर भागातील हॉटेल कार्तिकी येथे उघडकीस आली. निकेत श्रीनिवास दलाल (43, रा. खडकेश्वर) असे मृत खेळाडूचे नाव आहे. निकेत हे माजी उपमहापौर लता दलाल यांचे चिरंजीव होते.

Ironman Niket Dalal death
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगरात थरारनाट्य : बालसुधारगृहातून 9 अल्पवयीन मुलींचे सिनेस्टाईल पलायन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकेत यांच्या घरी सोमवारी रात्री अचानक आगीची घटना घडल्याने ती विझवताना घरात सर्वत्र पाणी झाले होते. जागा झोपण्यासाठी योग्य नसल्याने घरातील अन्य सदस्य हे नातेवाईकांकडे गेले होते. तर निकेत हे कार्तिकी हॉटेल येथे मुक्कामासाठी गेले होते. दरम्यान मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास निकेत हे हॉटेल कार्तिकी मध्ये दुसर्‍या मजल्यावर पडून जखमी झाल्याची माहिती नातेवाईकांना समजली.

निकेत यांना तात्कळ घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी साडेनऊच्या सुमारास तपासून त्यांना मृत घोषित केले. घाटी रुग्णालयात त्यांचा मित्रपरिवार, नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Ironman Niket Dalal death
Pune News: मृत्यूची तारीख लिहून भीती दाखवत भक्तांसोबत अश्लील चाळे; भोंदूबाबाचे कारनामे उघड

निकेत हे जखमी होऊन मृत झाले. त्यांचा हातही फ्रॅक्चर झाला होता. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे ठोस कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. हॉटेलमधील सीसीटीव्हीची तपासणी करून तपास केला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील माने यांनी दिली.

देशातील पहिले तर जगातील पाचवे दिव्यांग आयर्नमॅन

निकेत देशातील पहिले तर जगातील पाचवे दिव्यांग आयर्नमॅन होते. 2020 साली दुबईतील स्पर्धेत निकेत यांनी स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग हा अवघड प्रवास पार करून अभिमानास्पद राष्ट्रीय विक्रम केला होता. निकेत यांची सायकलिंग, स्विमिंग यासह अन्य खेळप्रकारात जागतिकस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. चेन्नई येथील राष्ट्रीय ट्रॉयथॉलन स्पर्धेतही त्यांनी स्वर्णपदक पटकावले होते. यासह अन्य स्पर्धांमध्ये त्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले होते. दिव्यांग असूनही त्यांनी जिद्दीने आयर्नमॅन होण्याचे स्वप्न पूर्ण करून सर्वांनाच आदर्श घालून दिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news