

Hatnur Shivna Takli Dam water level
हतनूर : कन्नड तालुक्यातील हतनूर परिसरातील शिवना टाकळी प्रकल्प ६०.५३ टक्के भरला आहे. जुलै महिन्यात संततधार झालेल्या पावसाने तालुक्यातील धरणे भरली आहेत. त्यामुळे परिसरातील शेतक-यांची पाण्याची चिंता मिटली आहे.
शिवना टाकळी प्रकल्पाची ५६१.८० द.घ.मी इतका पाणी साठ्याची क्षमता आहे. या प्रकल्पांमध्ये आतापर्यंत ५५१.८० (द.ल.घ.मी.) इतका पाणीसाठा झाला आहे. यापैकी आजचा उपयुक्त पाणीसाठा ३९.३६६ (द.ल.घ.मी) म्हणजे ६०.५३ टक्के इतका झाला आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतक-यांची पाण्याची चिंता मिटली आहे.
सलग चौथ्या वर्षी हा प्रकल्प भरला आहे. यंदाही पाणीसाठा उपलब्ध असल्याने आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जोत्याची पाणी पातळी = ५५१.८० (दलघमी)
पूर्ण संचय पाणी पातळी = ५६१.८०(दलघमी)
प्रकल्पीय पूर्ण संचय क्षमता (दलघमी) = ३९.३६६
प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा= ३६.४९९(दलघमी)
आजची पाणी पातळी= ५५९.७०(दलघमी)
आजची जल क्षमता= २५.००१(दलघमी)
आजचा उपयुक्त पाणीसाठा= २२.०८४(दलघमी)
पाणी टक्केवारी= ६०.५३ टक्के
सांडवा= (० निरंक)
उजवा कालवा विसर्ग=(० निरंक)
डावा कालवा विसर्ग =(० निरंक)