Sambhajinagar News : महापालिका आयुक्तांनाच दिली चुकीची माहिती, स्वच्छता निरीक्षक निलंबित

चुकीची माहिती दिल्याप्रकरणी विभागीय चौकशीचेही आदेश
Sambhajinagar News
Sambhajinagar News : महापालिका आयुक्तांनाच दिली चुकीची माहिती, स्वच्छता निरीक्षक निलंबितFile Photo
Published on
Updated on

Sanitation inspector suspended for providing incorrect information to the Municipal Commissioner

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्जविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करून महापालिका आयुक्तांनाच चुकीची माहिती दिल्याचा ठपका ठेवत झोन क्रमांक ४ चे प्रभारी स्वच्छता निरीक्षक गणेश सुधाकर चांदणे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी ही कारवाई करत त्यांच्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेशही दिले आहेत.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेची आयुक्तांकडून पाहणी

महापालिका आयुक्त अमोल येडगे हे झोन क्रमांक ४ मधील विविध भागांची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी जाधववाडी सिग्नल परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्ज आढळून आले. याबाबत संबंधित प्रभारी स्वच्छता निरीक्षक गणेश चांदणे यांच्याकडे विचारणा करण्यात आली.

यावर सुरुवातीला त्यांनी हे बॅनर्स राजकीय स्वरूपाचे असल्याने कारवाई करण्यात आलेली नसल्याचे सांगितले. त्यानंतर पावसामुळे तसेच विद्युत खांबांवर लावलेल्या बॅनर्समुळे विजेचा धक्का बसण्याचा धोका असल्याने ते काढता आले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र काही वेळातच संबंधित बॅनर्स हटविण्यात आल्याने चांदणे यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासह कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्तांनी चांदणे यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली. तसेच पाहणीदरम्यान झोन क्रमांक ४ मधील प्रमुख चौकांमध्येही अनेक अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आल्याचेही आढळून आले.

Sambhajinagar News
Hingoli news | माहिती दडविल्याप्रकरणी नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकांना ३० हजारांचा दंड

महापालिका दरम्यान, आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार, गणेश चांदणे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ अन्वये त्यांना तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निलंबनाच्या कालावधीत चांदणे यांचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथेच राहणार असून, महापालिका आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. या कालावधीत कोणताही खासगी व्यवसाय किंवा नोकरी करता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news