Digital Agriculture : डिजिटल कृषीत संभाजीनगरची देशपातळीवर बाजी !

केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी गौडा, कृषी अधिकारी गवळी यांचा गौरव
डिजिटल कृषीत संभाजीनगरची देशपातळीवर बाजी !
डिजिटल कृषीत संभाजीनगरची देशपातळीवर बाजी !file photo
Published on: 
Updated on: 

Sambhajinagar's Digital Agriculture Initiative Triumphs at the National Level!

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डिजिटल कृषी तंत्रज्ञानाच्या वापरातून कृषी योजनांच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा देशपातळीवर गौरव करण्यात आला. नवी दिल्लीतील पूसा येथील एनएएससी संकुलात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विनय गौडा आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांना सोमवारी (दि. १२) सन्मानपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

डिजिटल कृषीत संभाजीनगरची देशपातळीवर बाजी !
Crime News : 'पार्टी दे, नाहीतर संपवतो'; अल्पवयीनने मित्राच्या छातीत खुपसला चाकू

प्रधानमंत्री डिजिटल कृषी/किसान योजनेअंतर्गत जिल्ह्याने केलेल्या कामाची दखल घेण्यात आली. ई-पीक पाहणी, थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल कृषी सेवांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत योजनांचे लाभपारदर्शकपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी यज्ञेश कातबने उपस्थित होते.

पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी जिल्ह्याच्या कामगिरीचे कौतुक केले. हा सन्मान कृषी विभागासह ग्रामविकास, कृषी विज्ञान केंद्र, सहकार, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि अग्रणी बँकेसह संबंधित यंत्रणा तसेच तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या शेतकऱ्यांचा असल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.

डिजिटल कृषीत संभाजीनगरची देशपातळीवर बाजी !
Crime News : आमच्या भागात राहायला का आले ? म्हणत तरुणाला भोसकले

कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांमुळे हा गौरव मिळाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी नमूद केले. या राष्ट्रीय सन्मानामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण जिल्ह्यातून प्रशासनाचे व विशेषत कृषी विभागाचे अभिनंदन होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news