illegal tape in auto rickshaw : रिक्षात वाढता टेपचा दणदणाट : प्रवासी हैराण

आरटीओ, पोलिस वाहतूक शाखा सारवर झोपेत
illegal tape in auto rickshaw
रिक्षात वाढता टेपचा दणदणाट : प्रवासी हैराणpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरात विविध रस्त्यांवर प्रवासी सेवा देणाऱ्या रिक्षांत टेपचा दणदणाट सुरू आहे. विशेष कारवाई करणारे आरटीओचे अधिकारी आणि चौकाचौकांतील पोलिस वाहतूक शाखेचे अधिकारी जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करत असल्याने हा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. रिक्षात विनापरवाना टेप वाजवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

रिक्षा विविध मागींवर प्रवासी सेवा देत आहेत. त्यात काही रिक्षाचालक हे तरुण आणि हौसी आहेत. हे तरुण रिक्षाचालक कोणाचीही तमा न बाळगता मोठ्या आवाजात टेप लावून प्रवासी वाहतूक करतात. याला प्रवाशांनी विरोध केला तर तात्काळ प्रवाशांना अर्ध्या रस्त्यात उतरवणे किंवा त्यांच्याशी उद्धटपणाने वागणे असे प्रकार दररोज शहरात घडत आहेत. रिक्षात टेपला परवानगी नसतानाही शहरातील अनेक रिक्षांत टेपचा दणदणाट सुरू आहे. याकडे पोलिस वाहतूक शाखा आणि आरटीओचे वायुवेग पथक दुर्लक्ष करत असल्याने रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

illegal tape in auto rickshaw
vegetable price fluctuation : भाजीपाल्याच्या दरात चढ-उतार

प्रवाशांशी उद्धटपणा सिडको ते रेल्वेस्टेशन या मार्गावर रिक्षातील टेपच्या दणदणाटाने सीमा ओलांडली आहे. अनेक रिक्षाचालक बिनबोभटपणे टेप वाजवत भरधाव रिक्षा दामटवत आहेत. याचा प्रवाशांसह इतर वाहनधारकांनाही त्रास होत आहे. प्रवाशांनी टेप बंद करण्यास सांगितले तर त्यांच्याशी उद्धटपणे वागण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. यातून अपघात वाढण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिस वाहतूक शाखेचे दुर्लक्ष

पोलिस वाहतूक शाखा केवळ कागदपत्रे आणि ओव्हरसीट एवढीच कारवाई करत आहे. अनेकदा पोलिस वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसमोरून हे रिक्षाचालक टेपच्या दणद-णाटात जातात, परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. यामुळे प्रवाशांत नाराजी पसरली असून, अशा रिक्षाचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

illegal tape in auto rickshaw
Chatrapati Sambhajinagar : युद्धामुळे खाद्यतेलाच्या दरात १६ ते २० रुपयांची वाढ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news