छत्रपती संभाजीनगर: पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयात पंचायत विभागात विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेला दीपक लक्ष्मण बागुल नावाचा अधिकारी एक लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई आज (दि. १३) करण्यात आली. (Chhatrapati Sambhajinagar News)
सरपंच पद आणि सदस्यत्व रद्द करण्यात यावे, यासाठी दाखल प्रकरणातील सुनावणी सरपंच यांच्या बाजूने लावावी. यासाठी विभागीय आयुक्त यांना अहवाल सादर करण्यासाठी या विस्तार अधिकाऱ्याने एक लाखांची लाच मागितली होती. यावेळी लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Chhatrapati Sambhajinagar News)