Sambhajinagar Drought : दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जि. प. सज्ज

जिल्ह्यात ४६५ टँकर, ३८२ नवीन विंधन विहिरींचे नियोजन
Sambhajinagar Drought
Sambhajinagar Drought : दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जि. प. सज्जfile photo
Published on: 
Updated on: 

Sambhajinagar Zilla Parishad geared up to tackle drought conditions

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने टंचाई निवारणासाठी उपाययोजनांना गती दिली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ४६५ टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत असून, ३८२ ठिकाणी नवीन विंधन विहिरी घेण्याचा विचार सुरू आहे.

Sambhajinagar Drought
Sambhajinagar News : चिकलठाण्यातील ५०९ प्लॉटधारकांची पालकमंत्र्यांकडे धाव

याशिवाय ७९ गावांतील विंधन विहिरींच्या दुरुस्तीची गरज असून, सुमारे आठ लाख जनावरांच्या चारा व पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी दिले. दुष्काळ व टंचाई निवारणाच्या अनुषंगाने अध्यक्ष गलांडे यांनी सोमवारी (दि. १२) विविध विभागांची आढावा बैठक घेतली.

यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिन्नू, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे होते. संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. टँकरची संभाव्य गरज लक्षात घेऊन नियोजन करावे, तसेच विंधन विहिरींची दुरुस्ती आणि नवीन विहिरींच्या कामांसाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या. संबंधित विभागांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा नियमित आढावा घेऊन उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे गलांडे यांनी स्पष्ट केले.

Sambhajinagar Drought
Gangakhed : अकोलीच्या वारकरी शिक्षण संस्थेतील १८ विद्यार्थ्यांना विषबाधा

आठ लाख जनावरांसाठी चारा-पाण्याचे नियोजन दुष्काळी परिस्थितीत पशुधनाच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे आठ लाख जनावरांसाठी गावनिहाय नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक गावातील पशुधनाची संख्या, उपलब्ध चारा आणि भविष्यातील गरज यांची प्रत्यक्ष माहिती संकलित करावी. पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, असे गलांडे यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news