Verul News | वेरूळमध्ये भुयारी मार्गाचे काम सुरू; महावीर चौक ते भोसले चौक मार्ग अवजड वाहनांसाठी बंद

पर्यायी रस्ता नसल्याने भाविक, पर्यटकांसह वाहनधारकांची गैरसोय
Verul Heavy Vehicles Banned
घृष्णेश्वर मंदिर परिसरात भुयारी मार्गाला सुरुवातPudhari
Published on: 
Updated on: 

Verul Heavy Vehicles Banned

वेरूळ : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात भुयारी मार्गासह विविध विकासकामांना सुरुवात झाली आहे. या कामांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार (दि. २) पासून महावीर चौक ते भोसले चौक मार्ग जड-अवजड वाहनांसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे. मात्र, वाहतूक बंद केल्यानंतर स्पष्ट पर्यायी मार्ग उपलब्ध करून न दिल्याने भाविक, पर्यटक, वाहनधारक तसेच स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

भुयारी मार्गाच्या कामामुळे वेरूळ परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. वेरूळ लेणीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी तुलसी हॉटेलजवळील येळगंगा नदीवर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. तर वेरूळ गावाकडून येणाऱ्या वाहनांसाठी हरिगिरी महाराज मठाजवळ बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. महावीर चौक आणि भोसले चौक परिसरातही वाहतूक नियंत्रित करण्यात येत आहे.

Verul Heavy Vehicles Banned
Sambhajinagar News : झोन ५ च्या वॉर्ड अधिकाऱ्याला बजावली कारणे दाखवा नोटीस

महावीर चौक ते भोसले चौक मार्गावर जड-अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आल्याने या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसमोर अडचण निर्माण झाली आहे. विशेषतः बाहेरून येणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गाची स्पष्ट माहिती मिळत नसल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, घृष्णेश्वर मंदिर परिसरातील भुयारी मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, खोदकाम आणि माती हटविण्यासाठी एक एलएनटी मशीन, एक जेसीबी, चार हायवा आणि दोन ट्रॅक्टर कार्यरत आहेत. कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.

Verul Heavy Vehicles Banned
Sambhajinagar News : १,३५४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी

घृष्णेश्वर मंदिर आणि जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांमुळे परिसरात दररोज मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक येतात. त्यामुळे वाहतूक बंद करण्यापूर्वी सुरक्षित पर्यायी मार्ग निश्चित करून त्याची माहिती देणारे दिशादर्शक फलक बॅरिकेडिंगच्या ठिकाणी लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विकासकामांना विरोध नसून, कामाच्या काळात वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news