sambhajinagar crime news
भरदिवसा दुकानदार महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडलीfile photo

भरदिवसा दुकानदार महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडली

चोरांची हिम्मत वाढली; पडेगाव परिसरातील घटना
Published on

sambhajinagar The gold chain around the woman's neck was snatched.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहर परिसरातील चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, पडेगाव कचरा डेपो जवळील बोधीनगर भागात एका महिला दुकानदाराच्या गळ्यातील १६ ग्रॅमची सोन्याची पोत दुचाकीवर आलेल्या दोघांनी हिसकावून नेल्याची नेली. ही घटना सोमवारी (दि.२) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

sambhajinagar crime news
Crime News : अश्पाक पटेल गँगची नशा उतरवली !

फिर्यादी सुजाता संदीप धिवर (३३, रा. मिटमिटा) यांचे शनिमंदिर ते पडेगाव कचरा डेपोदरम्यान बोधीनगर भागात समृद्धी जनरल स्टोअर व कॉस्मेटिक नावाचे दुकान आहे. सोमवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास त्या नेहमीप्रमाणे दुकानात बसलेल्या होत्या. यावेळी निळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून दोन अज्ञात इसम तेथे आले.

त्यातील एकाने दुकानात येऊन बोरोलीनची डबी मागितली. सुजाता या डबी काढून देत असताना, चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जोरात हिसकावून घेतली. त्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून दोघेही शनिमंदिरच्या दिशेने वेगाने पसार झाले. फिर्यादीने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे हाती लागले नाहीत.

या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक काकासाहेब नागवे करत आहेत. आता शहराच्या आजूबाजूच्या वसाहती टार्गेट गेल्या महिन्यात चोरट्यांनी परिमंडळ दोनमधील जवाहरनगर, मुकुंदवाडी, उस्मानपुरा, एम सिडको, सिडको, पुंडलिकनगर या भागात सुमारे १३ हून अधिक मंगळसूत्र हिसकावून पोलिसांना खुले आव्हान दिले होते.

त्यानंतर आता परिमंडळ एक मधील शहराच्या आजूबाजूच्या वसाहती टार्गेट केल्या आहेत. थेट दुकानात जाऊन महिलेची पोत ओरबाडण्यापर्यंत चोरांची मजल गेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news