Sambhajinagar News : द्रुतगती मोजणी १४ दिवसांत, नियमित २८ दिवसांत पूर्ण करा

जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
Sambhajinagar News
Sambhajinagar News : द्रुतगती मोजणी १४ दिवसांत, नियमित २८ दिवसांत पूर्ण कराfile photo
Published on
Updated on

sambhajinagar Rapid Counting Land Records

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील द्रुतगती मोजणी प्रकरणे १४ दिवसांत तर नियमित मोजणी प्रकरणे २८ दिवसांत पूर्ण करून अर्जदारांना नकाशाची क प्रत देण्यात यावी, असे निर्देश जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख शैलेश नवाल यांनी येथे दिले.

Sambhajinagar News
Hingoli news | माहिती दडविल्याप्रकरणी नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकांना ३० हजारांचा दंड

जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख शैलेश नवाल यांनी २१ व २२ मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथे भेटी देऊन भूमी अभिलेख विभागाच्या विविध कामांचा आढावा घेतला. उपसंचालक भूमी अभिलेखच्या प्रदेश कार्यालयास भेट देऊन त्यांनी विभागातील सर्व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, उप अधीक्षक भूमी अभिलेख व नगर भूमापन अधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी प्रलंबित प्रकरणे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

विशेषतः ज्या तालुक्यांमध्ये द्रुतगती मोजणी १४ दिवसांत आणि नियमित मोजणी २८ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्या तालुक्यांचा प्रकरणनिहाय आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना त्यांनी केल्या. तसेच प्रशिक्षण प्रबोधिनीला भेट देऊन आवश्यक सुधारणा, निधी प्रस्ताव सादर करणे तसेच प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी याबाबत मार्गदर्शन केले.

Sambhajinagar News
ग्रॅच्युइटी ही मालकाची मर्जी नाही, तो कर्मचाऱ्याचा हक्कच : उच्च न्यायालय

प्रत्येक मिळकतीस स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड

प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड व नकाशा उपलब्ध व्हावा यासाठी विविध कार्यालयांत सुरू असलेली मिळकतींची एकत्रित गठ्ठा कार्ड पद्धत रद्द करून प्रत्येक मिळकतीचे स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड व नकाशा तयार करण्यासाठी मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार करून तत्काळ अंमलबजावणी सुरू करण्याचे निर्देश नवाल यांनी दिले.

१ जूनपासून राज्यभर नवीन कार्यपद्धती

भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनीच्या सभागृहातून राज्यातील सर्व उपसंचालक व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत १ जून २०२६ पासून राज्यातील निवडलेल्या सर्व कार्यालयांत द्रुतगती मोजणी १४ दिवसांत आणि नियमित मोजणी २८ दिवसांत पूर्ण करून नकाशा ङ्गङ्घकफ्फप्रत देण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news