Sambhajinagar Rain : जिल्ह्यात सरासरीच्या ८९.५ टक्के पाऊस

जिल्ह्यात मान्सूनची प्रगती संथ असली तरी काही तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे.
Sambhajinagar Rain Update
Sambhajinagar Rain : जिल्ह्यात सरासरीच्या ८९.५ टक्के पाऊसfile photo
Published on
Updated on

Sambhajinagar Rain: District receives 89.5% of average rainfall

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मान्सूनची प्रगती संथ असली तरी काही तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. २ जुलैअखेर जिल्ह्यात १ जूनपासून एकूण १२०.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, तो सरासरीच्या ८९.५ टक्के आहे. जून महिन्यात जिल्ह्यात १०७.९ मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीच्या ८६.२ टक्के आहे.

Sambhajinagar Rain Update
Marathwada Monsoon | मराठवाड्यात मान्सूनची संथ वाटचाल; २ जुलैअखेर केवळ १८.८ टक्के पाऊस

तालुकानिहाय पाहता वैजापूरमध्ये सर्वाधिक ११४.३ टक्के, तर फुलंब्रीमध्ये १०३.७ टक्के पाऊस झाला आहे. सोयगाव (९८.१ टक्के), सिल्लोड (९४.६ टक्के), गंगापूर (९३.७ टक्के) आणि पैठण (९१.६ टक्के) येथेही पावसाची स्थिती समाधानकारक आहे. दुसरीकडे खुलताबाद (७०.२ टक्के), कन्नड (७५.६ टक्के) आणि छत्रपती संभाजीनगर तालुका (८१ टक्के) येथे सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

Sambhajinagar Rain Update
Jalna Rain - जालना जिल्ह्यात ११९ मि.मी. पाऊस; मागील चोवीस तासांत १३.८ मि.मी. पाऊस

गेल्या २४ तासांत खुलताबाद तालुक्यात सर्वाधिक ३१ मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल फुलंब्रीमध्ये १९.९ मिमी, कन्नडमध्ये १७.१ मिमी, सिल्लोडमध्ये १६.५ मिमी, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात १५.६ मिमी, वैजापूरमध्ये १० मिमी, गंगापूरमध्ये ९.१ मिमी, सोयगावमध्ये ८.७ मिमी आणि पैठणमध्ये ३.४ मिमी पावसाची नोंद झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news