Chhatrapati Sambhajinagar Crime : .. कुख्यात गुंड राहुल चाबुकस्वार टोळीवर दुसऱ्यांदा 'मोक्का'

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांचा दणका; १५ गुंडांवर आवळला कायद्याचा फास
Chhatrapati Sambhajinagar Crime
कुख्यात गुंड राहुल चाबुकस्वारpudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट आणि सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करून खंडणी उकळणाऱ्या गारखेडा परिसरातील कुख्यात गुंड राहुल साहेबराव चाबुकस्वार आणि त्याच्या टोळीला पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी १५ दिवसांत दुसऱ्यांदा दणका दिला आहे. लूटमार, खंडणी, अवैध सावकारीचे दोन गंभीर गुन्हे दाखल होताच मोक्का अंतर्गत दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. डझनभर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या फरार चाबुकस्वारच्या अडचणी आणखी वाढल्या असून टोळीचे धाबे दणाणले आहेत. या टोळीतील सहा आरोपी अटक आहेत.

एमआयडीसी सिडको ठाण्यात ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, तक्रारदार ज्ञानेश्वर दादासाहेब बारे हे ३० सप्टेंबर २०२६ रोजी आर्किटेक्ट सुभाष जोशी यांच्याकडे बांधकाम साईटवरील मजुरांचे पेमेंट आणि साहित्याची खरेदी करण्यासाठी स्वतःच्या इनोव्हा कारमधून तब्बल ७लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन गेले होते. त्यावेळी सुधीर कातकडे, शिवाजी कातकडे, टोळीप्रमुख राहुल चाबुकस्वार आणि त्यांच्या इतर साथीदारांनी पूर्वनियोजित कट रचून बारे यांना अडवले.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Sambhajinagar Land Acquisition Controversy : मनपाने परवानगीविना बदलला जागेचा वापर

आरोपींनी बारे यांना भररस्त्यात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची थेट धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीकडील रोकड आणि गाडी लुटून नेली. यापूर्वीही पैशांच्या जुन्या व्यवहारावरून फिर्यादीला वारंवार धमकावण्यात आले होते.

'या' १५ गुंडांवर ओढवला मोक्काचा फास

राहुल साहेबराव चाबुकस्वार (४७, रा. हुसेन कॉलनी, गारखेडा - टोळीप्रमुख), निलेश उर्फ सुरेश नारायण रांजणे (३०, रा. न्यायनगर), अमोल शामराव साळुंके (२५, रा. गणेशनगर), आकाश शामराव साळुंके, सुधीर गोरख कातकडे, अलीम बुढण शेख (२७, रा. देवळाई), सागर हरिदास किर्तीकर (३५, रा. अयोध्यानगर), सुनिल शिंदे, आकाश पंडित गायकवाड (३०, रा. चौधरी कॉलनी), सचिन कल्याण मुगदल (२३), अजय सुभाष डोखळे (२७), आकाश हरिभाऊ मुखेदल (२२, तिघे रा. मसनतपूर), संदीप, विशाल सावंत आणि अजय रगडे अशी आरोपींची नावे आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Nanded Ganja Seizure : नांदेडमध्ये सव्वादोन लाखांचा गांजा जप्त; दोघांना बेड्या

टोळीवर बलात्कार, बालकांचा छळ अन् खुनाचे गंभीर गुन्हे

राहुल चाबुकस्वार याने स्वतःची संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून आर्थिक फायद्यासाठी शहरात दहशतीचे साम्राज्य उभे केले होते. टोळीवर यापूर्वी खंडणी उकळण्यासाठी अपहरण करणे, दरोडे टाकणे आणि प्राणघातक हल्ले करणे. बलात्कार आणि बालकांचा लैंगिक छळ करणे. खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे आणि बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणे, शासकीय सेवकांना कर्तव्यात अडथळा आणून धमकावणे, तडीपारी आदेशांचे वारंवार उल्लंघन करणे. नागरिकांची घरे व जागांवर बेकायदेशीर अतिक्रमण करून दमदाटी करणे. अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने ही टोळी समाजासाठी अत्यंत घातक बनली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news