Sambhajinagar plastic ban raid : जुना मोंढ्यात तब्बल २ ट्रक प्रतिबंधित प्लास्टिक जप्त; मनपाची धडक कारवाई

संबंधितांकडून ६५ हजार रुपयांचा दंड वसूल
Sambhajinagar plastic ban raid
जुना मोंढा भागात प्रतिबंधित कॅरीबॅगचा साठा जप्त करताना महापालिकेचे पथक.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नाले तुंबण्याला आणि आरोग्याच्या समस्येला कारणीभूत ठरणाऱ्या प्रतिबंधित प्लास्टिक कॅरीबॅगविर-ोधात महापालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवारी (दि. २८) जुना मोंढा भागात धाड मारून पथकाने तब्बल दोन ट्रक (६.४ टन) प्लास्टिक जप्त केले. याप्रकरणी संबंधितांकडून ६५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, वारंवार साठा आढळल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचा कडक इशारा आयुक्त अमोल येडगे यांनी दिला आहे.

शासकीय बंदी असूनही शहरात सर्रास प्लास्टिकचा वापर सुरू आहे. यावर कारवाई करत मनपा पथकाने गेल्या पाच दिवसांत तब्बल १३ हजार किलो कॅरीबॅग जप्त करून दीड लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे. मंगळवारी उपायुक्त नंदकिशोर भोंबे आणि स्वच्छता निरीक्षक अनिल जाधव यांच्या पथकाने जुना मोंढा येथील मजीवन प्लास्टिकफ आणि एकदंत ट्रेडर्सवर अचानक छापा टाकला. येथून साठा जप्त करत प्रत्येकी २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. कारवाईत देवीदास सुसर, स्वर्णसिंग परदेशी, बालाजी साबळे, जयेश मगरे आणि नागरी मित्र पथक सहभागी होते.

Sambhajinagar plastic ban raid
Chhatrapati Sambhajinagar | प्लास्टिकवर मनपाचा दुहेरी प्रहार

भाजीमंडईवर करडी नजर

भाजीमंडईमध्ये सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या विक्रेते आणि ग्राहकांवरही आता महापालिकेची नजर असणार आहे. उपायुक्त भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला जनजागृती व नंतर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

Sambhajinagar plastic ban raid
Jalgaon theft news | पारोळ्यात धाडसी डल्ला; साडेपाच लाखांची पिशवी लंपास

जेवण पुरवठादारालाही दंड

मनपाच्या प्रशिक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांना जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदाराने प्लास्टिक ताटांचा वापर केल्याचे निदर्शनास येताच, त्याच्यावरही ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news